शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : कोरोना लस घेतलेल्या लोकांकडूनही डेल्टा विषाणूच्या प्रसाराचा धोका, ब्रिटनमधील संशोधनाचा निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2021 05:54 IST

Corona Virus : लस घेतलेल्या लोकांना जर पुन्हा कोरोना संसर्ग झाला तर त्यातून ते लवकर बरे होतात. मात्र, तेही लस न घेतलेल्यांप्रमाणेच डेल्टा विषाणूचा प्रसार करण्याची शक्यता असते.

लंडन : लस न घेतलेल्या लोकांइतकाच लस घेतलेल्या लोकांकडूनही कोरोनाच्या डेल्टा विषाणूचा प्रसार होण्याचा धोका आहे असे यासंदर्भात ब्रिटनमध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासातून दिसून आले आहे. लॅन्सेट नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या लेखात ही माहिती देण्यात आली आहे.लस घेतलेल्या लोकांना जर पुन्हा कोरोना संसर्ग झाला तर त्यातून ते लवकर बरे होतात. मात्र, तेही लस न घेतलेल्यांप्रमाणेच डेल्टा विषाणूचा प्रसार करण्याची शक्यता असते. कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यामुळे रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. या लसी डेल्टा विषाणूवर कमी परिणामकारक आहेत असा काही शास्त्रज्ञांचा दावा आहे. कोरोनाचा संसर्ग घरातील व्यक्तींपासून सर्वांत जास्त प्रमाणात होतो असे दिसून आले आहे. मात्र, लस घेतलेल्या लोकांकडून किती प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रसार होतो यावर आणखी अभ्यास होणे आवश्यक आहे.

आरोग्य यंत्रणेवर ताण-  डेल्टा विषाणूमुळे अमेरिकेमध्ये कोरोना साथीची स्थिती आणखी गंभीर बनली. जगात अमेरिकेत सर्वाधिक प्रमाणात लसीकरण होऊनही तिथे कोरोना रुग्णांची संख्या व त्यांच्या मृत्यूचे प्रमाण सर्वांत जास्त आहे. -   डेल्टा विषाणूने माजविलेल्या हाहाकारामुळे तेथील आरोग्य यंत्रणेवरही मोठा ताण पडला आहे. ब्रिटनमध्येही कोरोनामुळे गंभीर स्थिती निर्माण झाली. -   डेल्टा विषाणूला प्रतिबंध कसा करावा याकडे आता जगभरातील संशोधकाचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस