शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

Omicron Variant : ओमायक्रॉनचा हाहाकार; जगातल्या पहिल्या मृत्यूनं टेन्शन वाढवलं, इंग्लंडनं दिला महत्वाचा इशारा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2021 17:33 IST

ओमाक्रॉनमुळे मृत्यू झालेल्या या रुग्णाने कोरोना लस घेतली होती, की नाही अथवा यापूर्वी त्याला काही शारिरीक समस्या होती का? यासंदर्भात ब्रिटीश सरकारने माहिती दिलेली नाही. याच बरोबर, ओमाक्रॉनमुळे इतर देशांतही मृत्यू झालेला असण्याची शक्यता आहे. पण, ब्रिटनशिवाय कुणीही हे जाहीरपणे मान्य केलेले नाही.

UK मध्ये Omicron व्हेरिअंटच्या संसर्गाने पहिला बळी घेतला आहे. यानंतर आता पुन्हा एकदा जगात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ब्रिटनमध्ये ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण 27 नोव्हेंबरला समोर आला होता. तेव्हापासून तेथे अनेक कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. याच बरोबर, कोरोनाचा हा नवा व्हेरिअंट लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाही संक्रमित करू शकतो, असा इशारा ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी स्वतः लोकांना दिला आहे.

ओमाक्रॉनमुळे मृत्यू झालेल्या या रुग्णाने कोरोना लस घेतली होती, की नाही अथवा यापूर्वी त्याला काही शारिरीक समस्या होती का? यासंदर्भात ब्रिटीश सरकारने माहिती दिलेली नाही. याच बरोबर, ओमाक्रॉनमुळे इतर देशांतही मृत्यू झालेला असण्याची शक्यता आहे. पण, ब्रिटनशिवाय कुणीही हे जाहीरपणे मान्य केलेले नाही.

ओमायक्रॉनवर इशारा - लंडनमधील लसीकरण केंद्रात पत्रकारांशी संवाद साधताना पंतप्रधान जॉन्सन म्हणाले, 'ओमाक्रॉनमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला, ही अत्यंत दु:खद गोष्ट म्हणजे. यामुळे हा व्हायरसचा किरकोळ प्रकार आहे, ही कल्पना आपण बाजूला ठेवायला हवी. लोकांमध्ये पसरण्याचा वेग आपण लक्षात घ्यायला हवा.

आरोग्य सचिव साजिद जाविद यांनीही या व्हेरिअंटसंदर्भात लोकांना इशारा दिला आहे. ते म्हणाले, 'लंडनमध्ये 44% लोकांना या व्हेरिअंटची लागण झाली आहे आणि 48 तासांत तो राजधानीत पूर्णपणे पसरेल'. एवढेच नाही, तर रोज ओमायक्रॉनचे सुमारे 200,000 नवे रुग्ण समोर येऊ शकतात, असा अंदाजही जाविद यांनी व्यक्त केला आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉनCorona vaccineकोरोनाची लसEnglandइंग्लंड