शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Corona Virus : कोरोनाचा खात्मा सहज शक्य, पण कराव्या लागतील 'या' दोन गोष्टी; WHO नं सांगितला 'महामंत्र'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2022 13:45 IST

जागतिक आरोग्य संखटनेचे प्रमुख (WHO) टेड्रोस अधानोम घेब्रेयसस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी म्हटले आहे, की कोरोना महामारी संपवणे शक्य आहे. पण...

कोरोना विषाणूचा (Corona Virus) ओमायक्रॉन प्रकार समोर अल्यापासून जगभरातील कोरोना रुग्ण संख्या वेगाने वाढू लागली आहे.  देशातही गेल्या 24 तासांत 1,94,720 नवे करोना रुग्ण समोर आले आहेत. यामुळे आता देशातील संसर्ग दर 11.05 टक्क्यांवर पोहोचला आहेत. सध्या देशात 4868 जणांना  Omicronचा संसर्ग झाला आहे. जगात कोरोनाची ही नवी लाट आली असतानाच जागतिक आरोग्य संघटनेने पुन्हा एकदा सर्व देशांना लस पुरविण्यासंदर्भात भाष्य केले आहे.

जागतिक आरोग्य संखटनेचे प्रमुख (WHO) टेड्रोस अधानोम घेब्रेयसस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी म्हटले आहे, की कोरोना महामारी संपवणे शक्य आहे, पण यासाठी काही कठोर पावले उचलावी लागतील. टेड्रोस अधानोम म्हणाले, "कोरोनावर निश्चितपणे मात केली जाऊ शकते, परंतु यासाठी जगभरातील सर्व सरकारे आणि लस उत्पादकांना 2 गोष्टींची खात्री द्यावी लागेल. एक म्हणजे, ज्या देशांमध्ये लस पोहोचत नाही, परंतु तेथे कोरोनाचा धोका आहे, अशा देशांना लसींचा पुरवठा वाढविला जाईल आणि दुसरे म्हणजे, लोकांना लस देण्यासाठी आवश्यक संसाधने पुरेशा प्रमाणात पुरविली जातील. जोवर प्रत्येकजण सुरक्षित नाही, तोवर आपण कुठेही सुरक्षित नाही.

डब्ल्यूएचओ प्रमुख 2021 मधील आपल्या अखेरच्या भाषणातही म्हणाले होते की, "कोणताही देश या महामारीपासून वाचलेला नाही. आमच्याकडे कोरोनाला रोखण्यासाठी आणि त्यावर उपचार करण्यासाठी अनेक नवीन साधने आहेत. लसीची असमानता (अनेक लहान किंवा गरीब देशांत लस न पोहोचणे) जेवढ्या अधिक काळ सुरू राहील, तेवढाच हा विषाणू विकसित होण्याचा धोकाही अधिक असेल. त्याला आपण रोखू शकत नाही. आपण लसीची असमानता संपवली, तर आपण या महामारीचाही अंत करू शकू." 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसOmicron Variantओमायक्रॉनWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना