शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus: जगभरात बळींची संख्या चार हजारांवर; इराणमध्ये मृतांची संख्या २९१ वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2020 06:40 IST

कोरोनासारख्या खतरनाक विषाणूंपासून सुरक्षित राहण्यासाठी गुगलने सोमवारपासून सिलिकॉन व्हॅली, सॅन फ्रान्सिस्को आणि न्यूयॉर्क येथील कार्यालयांमध्ये प्रवेश करण्यास बंदी घातली आहे.

बीजिंग : चीनमध्ये कोरोना विषाणूंमुळे मंगळवारी आणखी १७ जणांचा मृत्यू झाला असून, त्यामुळे देशातील बळींची संख्या आता ३१३६ झाली आहे. या संसर्गामुळे जगभरात आतापर्यंत ४०११ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. १०० हून अधिक देशांमध्ये पसरलेल्या या विषाणूची लागण आतापर्यंत एक लाख १० हजार नागरिकांना झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

कॅनडात पहिला बळीकोरोनाने कॅनडात पहिला बळी घेतला आहे. पश्चिमी प्रांतातील ब्रिटिश कोलंबियाच्या आरोग्य अधिकारी बोनी हेनरी यांनी पत्रकारांना सांगितले की, एका ज्येष्ठ नागरिकाची सेवा करणाऱ्या व्यक्तीचे सोमवारी रात्री कोरोनाच्या संसर्गामुळे निधन झाले. कॅनडात आतापर्यंत ७० रुग्ण असल्याचे स्पष्ट झाले असून, सर्वांत जास्त रुग्ण हे ब्रिटिश कोलंबिया आणि ओंटारियो भागातील रहिवासी आहेत.

कू्रझवरील ३५०० प्रवाशांची सुटकाओकलैंड (अमेरिका) : कोरोना संसर्गामुळे पीडित असलेल्या कू्रझवरील ३५००हून अधिक प्रवाशांची सोमवारी सुटका करण्यात आली. हे जहाज ओकलैंड येथील कॅलिफोर्निया बंदरावर पोहोचले आहे. यामध्ये २१ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. बाकीच्या प्रवाशांना १४ दिवसांसाठी सैन्य शिबिरात ठेवण्यात येणार असल्याचे गव्हर्नर गाविन न्यूसोम यांनी सांगितले.

कोरोनावर चेष्टा करणे पडले महागजोहान्सबर्ग : कोरोना संसर्गासंबंधी चेष्टा करणे मूल भारत निवासी असलेल्या दोन दक्षिणी आफ्रिकन नागरिकांना महागात पडले आहे.पहिली घटना अशी, भारतातून डरबन येथे आलेल्या ५५ वर्षीय महिलेने दावा केला होता की, त्या कोरोना पीडित आहेत. यामुळे त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले; परंतु सर्व तपासण्याअंती त्यांना कोरोना संसर्ग नसल्याचे स्पष्ट झाले. यावर तिने आपण चेष्टा करत असल्याचे डॉक्टरांना सांगितले. मात्र, पोलीस चौकशीत त्या एका फसवणूकप्रकरणी होणाºया अटकेतून वाचण्यासाठी हा प्रकार करीत असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी तिला अटक करण्यात आली आहे. दुसºया घटनेत, एका स्पोर्टस् कारच्या मालकाने नंबरप्लेटवर ‘कोविड १९-जेडएन’ लिहिले आहे. यावरून सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

सिडनी : कोरोनाच्या धास्तीने आॅस्ट्रेलियातील क्वाटास विमान कंपनी १० डबल-डेकर असलेल्या ए ३८० मधील एकूण आठ विमानांची सेवा बंद करणार आहे.चीनमध्ये १०० वर्षांचा वृद्ध कोरोनामधून बरावयाचा १०० वा वाढदिवस साजरा केल्यानंतर कोरोना विषाणूची लागण झालेला व्यांग नावाचा वृद्ध बरा झाला आहे. त्याला स्मृतीभ्रंश (अल्झायमर) चा त्रास आहे. वुहानमधील हुबेई येथील रुग्णालयात शनिवारी ज्या ८० रुग्णांना घरी पाठविण्यात आले त्यामध्ये व्यांगचाही समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले.कोरोनाच्या धास्तीने ‘गुगल’मध्ये प्रवेश बंदकोरोनासारख्या खतरनाक विषाणूंपासून सुरक्षित राहण्यासाठी गुगलने सोमवारपासून सिलिकॉन व्हॅली, सॅन फ्रान्सिस्को आणि न्यूयॉर्क येथील कार्यालयांमध्ये प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. यापूर्वी अ‍ॅपल, फेसबुक, मायक्रोसॉफ्ट आणि अ‍ॅमेझॉनसारख्या अनेक आयटी कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरातूनच काम करण्याचे निर्देश दिले आहेत. ‘अ‍ॅपल’ने तर एप्रिलमध्ये होत असलेल्या प्रतिष्ठित अशा व्यापार संमेलनाचे आयोजनही पुढे ढकलले आहे. कोरोना संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी गुगलच्या काही कार्यालयांत बाहेरच्या व्यक्तींना आणि सहलीवर येत असलेल्या लोकांना प्रवेश बंद करण्यात आला असून भविष्यातील नोकरभरतीच्या मुलाखती या ‘व्हर्चुअल’च्या माध्यमातून घेण्यात येणार असल्याचे प्रवक्त्याने सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना