शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus: कोरोनाची हानी रोखण्यासाठी युरोपात हालचाली; आज होणार महत्त्वाची बैठक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2020 04:00 IST

कंपन्यांना सवलती व वित्तीय पाठबळ देण्याच्या उपाययोजनांवर विचार

फ्रँकफूर्ट : कोरोना विषाणूच्या साथीमुळे येऊ घातलेल्या मंदीचा दीर्घकालीन परिणाम रोखण्यासाठी युरोपीय देशांकडून व्यूहरचना आखण्यात येत आहे. कर सवलती आणि कंपन्यांना वित्तीय पाठबळ देण्यासारख्या उपायांवर विचार केला जात आहे. याशिवाय युरोपीय केंद्रीय बँकेकडूनही काही विशेष उपाय योजले जाणार आहेत.

सूत्रांनी सांगितले की, युरोपीय सेंट्रल बँकेच्या अधिकाऱ्यांची या संदर्भात एक बैठक गुरुवारी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपन्यांना मौद्रिक प्रोत्साहन योजना जाहीर केल्या जाऊ शकतात. व्याजदरात कपात आणि कॉर्पोरेट बाँड्सची खरेदी, असे निर्णय जाहीर केले जाऊ शकतात. आरोग्यसेवा, व्यवसाय आणि श्रमबाजार यांना पाठबळ देण्यासाठी २८ अब्ज डॉलरचा गुंतवणूक निधी उभारण्याची योजना ‘युरोपीय आयोगा’ने मंगळवारीच जाहीर केली आहे. ‘युरोपी आयोगा’च्या अध्यक्ष उर्सुला व्होन डेर लियेन यांनी सांगितले की, हा निधी युरोपीय संघाच्या सध्याच्या अर्थसंकल्पामधून घेतला जाईल. हा निधी युरोपीय संघाच्या वार्षिक २०.७ लाख कोटी डॉलर अर्थव्यवस्थेच्या अवघा ०.१ टक्का आहे. अशा उपाययोजनांनी कोरोनामुळे होणारे नुकसान मर्यादित राहील. मौद्रिक प्रोत्साहन योजना आणि सरकारी खर्चातील वाढीमुळे वस्तूंची मागणी वाढेल. दरम्यान, १९ देशांच्या युरोपीय संघाकडे मोठे केंद्रीय कोषागार नाही. ही युरोपीय संघाची मोठी समस्या आहे. मात करणे शक्य नाहीजाणकारांच्या मते, या उपायांचा परिणाम मर्यादितच राहील. पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे उद्योग बंद पडले आहेत. इटलीने नागरिकांच्या प्रवासावर, तसेच सार्वजनिक जमावावर संपूर्ण बंदी घातली. व्याजदर कमी केल्याने यावर काहीच परिणाम होणार नाही. बेरेनबर्ग खासगी बँकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ होल्गर श्मिडिंग यांनी सांगितले की, सध्या जग ‘आरोग्य आणीबाणी’चा सामना करीत आहे. या समस्येवर मौद्रिक आणि वित्तीय उपायांनी मात करता येणार नाही.वाहनांच्या उत्पादनावर परिणामकोरोना विषाणूच्या साथीमुळे चीनमधील उद्योग व्यवसाय पूर्णत: ठप्प झाल्याने भारतातील वाहन उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची भीती सोसायटी आॅफ इंडियन आॅटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम) या संघटनेने व्यक्त केली आहे. भारतीय वाहन उद्योगासाठी लागणारा १० टक्के कच्चा माल चीनमधून आयात होत असल्यामुळे ही भीती सियामने व्यक्त केली आहे. चिनी नववर्षाच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर भारतीय वाहन कंपन्यांनी कच्च्या मालाचा नियमित साठा करून ठेवला होता. तथापि, चीनमधील ताज्या ‘लॉकडाउन’मुळे बीएस६ वाहनांसाठी आवश्यक असलेले सुटे भाग उपलब्ध होण्यात अडथळे येऊ शकतात, असे सियामचे अध्यक्ष रंजन वधेरा म्हणाले.सुट्या भागांच्या उपलब्धतेअभावी सर्व श्रेणींमधील वाहनांच्या उत्पादनावर परिणाम होईल. प्रवासी वाहने, व्यावसायिक वाहने, तीनचाकी वाहने, दुचाकी वाहने आणि इलेक्ट्रिक वाहने यांच्या उत्पादनावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

टॅग्स :corona virusकोरोना