शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : युरोपवर पुन्हा कोरोनाचे भूत, जागतिक आरोग्य संघटनेची चिंता; भारतातही खबरदारी आवश्यक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2021 05:30 IST

Corona Virus :भारतातही गणेशोत्सवापासून सणासुदीचा काळ सुरू झाला असून, लोक मोठ्या प्रमाणात बाहेर पडू लागले आहेत. ते गर्दी करीत आहेत, मास्कचा वापरही आता कमी झाला आहे, काही राज्यांत अद्याप अधिक रुग्ण सापडत आहेत दिवाळी सुरू होण्याआधीच ही परिस्थिती आहे.

न्यूयॉर्क : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत चालला आहे, असे वाटत असले तरी प्रत्यक्ष स्थिती तशी नाही. युरोपमध्ये कोविडच्या रुग्णांचे प्रमाण अतिशय वेगाने वाढत आहे. त्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली असून, सर्वच देशांनी संसर्ग वाढू नये, यासाठी अधिक काळजी व खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले आहे.भारतातही गणेशोत्सवापासून सणासुदीचा काळ सुरू झाला असून, लोक मोठ्या प्रमाणात बाहेर पडू लागले आहेत. ते गर्दी करीत आहेत, मास्कचा वापरही आता कमी झाला आहे, काही राज्यांत अद्याप अधिक रुग्ण सापडत आहेत दिवाळी सुरू होण्याआधीच ही परिस्थिती आहे. दिवाळीच्या काळात अधिक सावध राहायला हवे, असे आवाहन केंद्र व राज्य सरकारने केले आहे.युरोपमध्ये गेल्या आठवड्यात महामारीचे सर्वात जास्त रुग्ण आणि मृत्यू झाले असून आहेत. इंग्लड वगळता युरोपात गेल्या आठवड्याच्या तुलनेत आता १९ टक्क्यांनी वाढले आहेत. सलग चार आठवडे युरोपात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. आशियामध्येही काही प्रमाणात रुग्णवाढ सुरू झाली आहे. चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव फारच वाढल्याने अनेक शहरे जणू पूर्णपणे बंद केली आहेत. तब्बल ४० लाख लोकांना घराच्या बाहेर पडण्यास बंदी घातली आहे.मृतांच्या संख्येत १४ टक्के वाढ झाली आहे, असे आरोग्य संघटनेने साप्ताहिक अहवालात म्हटले आहे. अमेरिका, ब्रिटनमध्ये लोकच अधिक खबरदारी बाळगताना दिसत आहेत. भारतात मात्र लोक काळजी घेत नाहीत, असे दिसून आले आहे.

आजार संपलेला नाही; तज्ज्ञांचे प्रतिपादन भारतात सध्या १ लाख ६१ हजार ३३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेले सलग ३५ दिवस रोजच्या नव्या रुग्णांची संख्या ३० हजारांच्या आत असून, गेले काही दिवस ती २० हजारांपेक्षाही कमी झाली आहे. देशामध्ये कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१९ टक्के आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस