शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
2
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
3
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
4
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
5
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
6
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
7
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
8
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
9
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
10
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
11
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
12
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
13
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
14
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
15
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
16
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
17
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
18
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
19
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
20
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला

कोरोना आणि बदलतं अर्थकारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 00:35 IST

गेल्या काही आठवड्यांत जगातील अनेक देशांच्या शेअरबाजाराचे निर्देशांक घसरले आहेत. त्या घसरणीस स्थानिक आणि तात्कालिक घटकांबरोबर चीनमधला कोरोना व्हायरसही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष स्वरूपात कारणीभूत आहेच.

- चन्द्रशेखर टिळक, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञसध्या जगभरातील प्रसारमाध्यमांत चीनमधील कोरोना व्हायरसची प्रचंड चर्चा आहे. याच्याशी निगडीत प्रत्येक बातमी खरी असेलच असे नाही, मात्र या कोरोना व्हायरसमुळे भारतासह अनेक देशांतील विमान कंपन्यांनी चीनसाठीची आपली उड्डाणे बंद केली आहेत. तसेच चीनमधील विद्यापीठात शिक्षण घेणारी अनेक मुले मायदेशी परतली तर काहींनी तेथे जाणे रद्द केले. परिणामी चिनी विद्यापीठाला आपले संपूर्ण वेळापत्रक बदलावे लागले आहे. शिक्षणक्षेत्र, विमानसेवा क्षेत्र, वैद्यकीय क्षेत्र यासह अर्थविश्वाशी निगडीत अनेक क्षेत्र कोलमडून पडली आहेत. परिणामी गेल्या काही आठवड्यांत जगातील अनेक देशांच्या शेअरबाजाराचे निर्देशांक घसरले आहेत. त्या घसरणीस स्थानिक आणि तात्कालिक घटकांबरोबर चीनमधला कोरोना व्हायरसही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष स्वरूपात कारणीभूत आहेच. जागतिक पातळीवर सुप्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरन बफे यांच्या मते चीनचा कोरोना व्हायरस हे तर जागतिक आर्थिक संकट आहे.आता आपल्या सगळ्यांनाच चक्रीवादळ ( सायक्लोन), भूकंप, बॉम्बस्फोट यांच्या बातम्यांची निदर्शने, रस्ताबंदी, ट्राफिक यांच्याइतकीच सवय झाली आहे. पण या सगळ्यात वरचढ असा विषय म्हणजे चीनमध्ये सुरू झालेला आणि आता जगाच्या अनेक देशांत पसरू लागलेला कोरोना या विषाणूचा संसर्ग. आपल्या नेहमीच्या भाषेत सांगायचे तर व्हायरसच तो !सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात कोणतीही बातमी अतिशय वेगाने आणि अनेकवेळा अवास्तव स्वरूपात फिरते हो. जरी कितीही मान्य केले तरी आजमितीस त्याबाबत पसरत असलेली आकडेवारी निव्वळ भयावह आहे यात कोणतीही शंका नाही.विषाणूचे प्रसरण हा प्रकार पूर्वीही होत होता. पण वाहतूक आणि दळणवळणाची साधने आजच्या तुलनेत त्यावेळी मर्यादित असल्याने रोगाचा प्रभाव आणि माहितीचा प्रसार या दोन्ही गोष्टींचा वेग आणि आवेगही मर्यादीत असायचा. त्यातच आधीच्या काळाच्या तुलनेत आजकाल सगळ्याच देशांत सगळ्याच गोष्टींचे जागतिकीकरण झाल्याने असं विषाणू प्रकरण हे केवळ जैविक ( बायॉलॉजिकल) किंवा वैद्यकीय (मेडिकल) स्वरूपाचे न राहता सामाजिक - राजकीय - आर्थिक होत जातात आणि होत राहतात.कोरोना व्हायरस हे प्रकरण मुळातच अनेक अर्थांनी दुर्लक्ष करण्याजोगे नाही. त्यातच जेंव्हा चिनी सरकारने स्वत:च्याच काही हजार विषाणूग्रस्त नागरिकांना जीवे मारण्याची त्यांच्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाकडून परवानगी मागितल्याची बातमी (खरी की खोटी कोण जाणे?) प्रसारमाध्यमांत आली तेंव्हा या प्रकरणाने जोर धरला. इथेच त्याला वेगवेगळे पैलू जोडले जाऊ लागले.भारत सरकारने दोनदा विशेष विमाने पाठवून विषाणूग्रस्त चीनी प्रदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणले. त्यात चीनी विद्यापीठात शिकत असलेल्या अनेक भारतीय विद्यार्थ्यांचा समावेश होता. अशा तºहेने चीनी विद्यापीठातून मायदेशी परत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. अनेक चीनी विद्यापीठांनी आपापल्या अभ्यासक्रमांचे वेळापत्रकच बदलले ( किंवा बदलावे लागावे ) हे कारण आहे की परिणाम हा निश्चितच चर्चेचा, अगदी वादाचा सुद्धा मुद्दा होऊ शकतो. त्यातून दोन गोष्टी समोर येतात. पाहिले म्हणजे शिक्षण क्षेत्र हा किती मोठा आर्थिक उद्योग, अगदी जागतिक पातळीवर बनला आहे याचा अंदाज येतो आणि दुसरे म्हणजे यावर्षी चीनी विद्यापीठे आपली वेळापत्रके बदलत असल्याने ( बदलावी लागत असल्याने ) जगातल्या इतर देशांतून चीनी विद्यापीठात जाणाºया किंवा जाऊ इच्छित असणाºया विद्यार्थ्याच्या संख्येवर, त्यांच्या प्राधान्यक्रमावर, किती प्रमाणात परिणाम होऊ शकतो हेही बघण्याजोगे असेल. कारण जागतिक स्तरावर इतर देशांशी सुसंगत असे वेळापत्रक चीनी विद्यापीठे किती लवकर आणू शकतात यावर ते अवलंबून असेल. दरम्यानच्या काळात इतर देशातील काही विद्यापीठांना सुगीचे दिवस येतील का आणि आल्यास अशी सुगी किती काळ टिकेल हा तर निखळ अर्थकारण विषय आहे.कोरोना विषाणू प्रभावामुळे अशी तरतूद आली असे म्हणणे नक्कीच तर्कसंगत ठरणार नाही ; पण तरीही आपल्या देशाच्या यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणूक (फोरिन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट ) येऊ देण्याची असलेली तरतूद, त्याची अंमलबजावणी आणि त्याला मिळणारा प्रतिसाद हे तर जागतिक अर्थकारण आहे आणि असेल.ही पुस्तकी चर्चा नाही. कोरोना विषाणूचा संसर्ग - प्रभाव - प्रसार ही बातमी पसरल्यानंतर सुमारे १०० अमेरिकी कंपन्यांनी आपले प्रकल्प चीनमधून इतरत्र हलवण्याची घोषणा केल्याची अनेक वर्तमानपत्रे देत असलेली बातमी दुसरे कसले आणि कशाचे उदाहरण आहे? अलीकडेच पार पडलेला अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दौरा अशा पार्श्वभूमीवर तर झाला नसेल ना? असे दौरे शेवटच्या क्षणी ठरत नसतात हे जरी कितीही मान्य केले तरी याची चर्चा दौºयात झालीच नसेल असं थोडेच आहे?याबाबतचे दुसरे उदाहरणही लक्षात घेता येईल. एअर इंडिया आणि इण्डिगो या दोन भारतीय विमान सेवा कंपन्यांनी पुढचे काही महिने चीनमध्ये जाणारी आपापली उड्डाणे रद्द केली आहेत. अशा उड्डाणाची तिकिटे त्याआधीच घेतलेल्या सर्व प्रवाशांचे पूर्ण पैसे परत देण्याची प्रक्रिया या दोन कंपन्यांनी सुरू केली आहे. हा प्रकार जगातील अनेक देशांच्या अनेक विमान कंपन्यांबाबत झाला आहे आणि होत आहे. विमान सेवा हा उद्योग तसाही किती भांडवल प्रधान असतो हे लक्षात घेतले तर त्याचा जागतिक अर्थकारणावर किती तºहेने आणि किती प्रमाणात परिणाम होऊ शकतो, होईल, झाला आहे, होत आहे ही सगळी गणिते आणि समीकरणे मांडणे सुरू झाले आहेच!एखाद्यावेळी सुरतमध्ये प्लेग आला किंवा डोंबिवलीत फिव्हर आला तर अशा स्थानिक स्वरूपाच्या आजाराचा औषध उद्योगाला किती फटका बसतो आणि किती फायदाही होतो हे आपण अनुभवले आहेच. ही उदाहरणे कोरोनाच्या तुलनेत अक्षरश: नगण्य आहेत. त्यामुळे कोरोनासारखा व्हायरस नेमक्या किती संधी आणि किती संकटे स्थानिक चीनी औषधी उद्योग आणि जागतिक औषध उद्योग यांच्या समोर निर्माण करेल किंवा केली आहेत हे विचारात घेण्याजोगे आहे. अर्थातच ती संधी किती जण, किती वेगाने, किती प्रमाणात आणि किती प्रभावीपणे साधू शकतात यावर ते सगळे अवलंबून असेल.याची एक आश्चर्यकारक बाजू व्हॉट्सअप मेसेजच्या रूपाने काही काळ फिरत होती. त्या मेसेजमध्ये एका नामांकित कंपनीच्या एका उत्पादनाची बाटली दाखवली होती. त्यात काही वावगे नाही. त्या उत्पादनाचा उपयोग कोरोना व्हायरसवर उपचार म्हणून करता येईल असं लिहिल्याचे त्या मेसेजमधल्या बाटलीच्या चित्रात लिहिले होते. आश्चर्य इतकेच की त्या बाटलीच्या उत्पादनाची तारीख ही कोरोना व्हायरस प्रादुर्भाव जाहीर होण्याच्या आधीची होती हे गौडबंगाल जर खरे असेल तर एक वेगळेच अर्थकारण पुढे आणते आणि ते केवळ आक्रमक मार्केटिंगचे अर्थकारण उरत नाही.

टॅग्स :corona virusकोरोना