शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination Importance: वेळ निघून गेली! मला लस न घेतल्याचा खरंच पश्चात्ताप होतोय; मृत्यूपूर्वी त्याने भावाला केला मेसेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2022 11:07 IST

Corona Vaccination Importance: अचानक साऱ्या गोष्टी घडल्या. आम्हाला तो बरा होऊन परतेल असे वाटत होते. परंतू दोन दिवसांनी हॉस्पिटलमधून फोन आला, मृतदेह कधी घेऊन जाताय? असे विचारण्यात आले. तेव्हा धक्काच बसला, असे मृताच्या भावाने सांगितले.

कोरोना लस घेण्यास नकार देणाऱ्या, टाळाटाळ करणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी बातमी आहे. कोरोनामुळे कोणी आपले आप्त स्वकीय, घरातील कमावती व्यक्ती गमावली आहे. हजारो लहान मुले पोरकी झाली आहेत. लस ने घेणाऱ्यांना जर कोरोना झाला तर त्यांच्या हातातून वेळ निघून गेलेली असते, याचा प्रत्यय अनेकांना आला आहे. असाच प्रकार कॅलिफोर्नियाच्या एका व्यक्ती सोबत घडला आहे. मृत्यूने गाठलेले असताना त्याला लस न घेतल्याचा पश्चाताप होत होता. 

ख्रिस्तिअन कॅब्रेरा या ४० वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तो तीन वर्षांच्या मुलाचा बाप होता. लस न घेतल्याचा त्याला अखेरच्या क्षणी पश्चाताप होत होता. परंतू वेळ निघून गेली होती, ना डॉक्टरांच्या हाती काही उरले होते, ना त्याच्या.  गेल्या आठवड्यात ख्रिस्तिअनचा मृत्यू झाला. त्याच्या एक आठवडा आधी त्याला कोरोनाची लागण झाली होती. 

ख्रिस्तिअनचा भाऊ जिनो याने फॉक्स ११ ला याची माहिती दिली. ख्रिस्तिअनने कोरोना प्रतिबंधक लस घेतली नव्हती. तो कधीही आजारी पडू शकत नाही, अशा प्रकारचे त्याचे बोलणे, वावरणे होते. विज्ञानावर त्याचा विश्वास नव्हता. परंतू मृत्यूच्या एक रात्र आधी त्याने पश्चाताप होत असल्याचा मेसेज लिहीला. ख्रिस्तिअनला शेरमन ओक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथून त्याने ''मी श्वास घेऊ शकत नाहीय. मी लस न घेतल्याचा आता पश्चाताप होतोय. जर घेतले असते तर आज माझे प्राण वाचवू शकलो असतो''. असा मेसेज पाठविल्याचे भावाने सांगितले.

ख्रिस्तिअनचा मृत्यू आणि त्याला झालेला कोरोना हे आमच्यासाठी धक्कादायक होते. अचानक साऱ्या गोष्टी घडल्या. आम्हाला तो बरा होऊन परतेल असे वाटत होते. परंतू दोन दिवसांनी हॉस्पिटलमधून फोन आला, मृतदेह कधी घेऊन जाताय? असे विचारण्यात आले. तेव्हा धक्काच बसला. हॉस्पिटलमध्ये मृतदेह ठेवण्यासाठी जागा नव्हती, त्यांना घाई होती, असे ख्रिस्तिअनचा भाऊ जिनो सांगितले. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या