शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

४० टक्के चिनी लोकसंख्येला कोरोना; जपानही विळख्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2023 08:47 IST

प्रत्येक शहरातील सुमारे ५० टक्के लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याचा दावा चीनचे महामारीशास्त्रज्ञ झेंग गुआंग यांनी केला आहे.

बीजिंग : चीनने देशातील कोरोना परिस्थिती कितीही झाकण्याचा प्रयत्न केला, तरी ती कोठून ना कोठून पुढे येत आहे. गेल्या महिन्यात चीनच्या ४० टक्के लोकसंख्येला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त एशिया टाइम्सने दिले आहे, तर येथील प्रत्येक शहरातील सुमारे ५० टक्के लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याचा दावा चीनचे महामारीशास्त्रज्ञ झेंग गुआंग यांनी केला आहे.

चिनी आरोग्य विभागाच्या एका लीक झालेल्या अहवालानुसार, दि. १ डिसेंबर ते २० डिसेंबरदरम्यान अडीच कोटी लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. चिनी कम्युनिस्ट पक्षावर देखरेख ठेवणाऱ्या मानवाधिकार कार्यकर्त्या जेनिफर झेंग यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला असून, चीनमध्ये स्मशानभूमीचा विस्तार केला जात असल्याचे दिसते. स्मशानभूमीत मृतदेहांचा ढीग आहे. जागेअभावी त्या ठिकाणी लांबच लांब रांगा लागत असून, अनेक दिवस प्रतीक्षाही सुरू आहे. हा व्हिडीओ हुनान प्रांतातील यियांग शहराचा आहे. 

जपानही विळख्यातजपानमध्येही कोरोना नियंत्रणाबाहेर जात आहे. गुरुवारी येथे २ लाख २६ हजारांहून अधिक प्रकरणे नोंदविली गेली आहेत. राजधानी टोकियोमध्येच २० हजार ७३५ प्रकरणे नोंदविली गेली, तर देशभरात ३३४ मृत्यू झाले आहेत. 

चीनचा संसर्ग कमी करण्याचा प्रयत्नचीनने कोविड साथीच्या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक उपाययोजना केल्यानंतर या महिन्यात चिनी नववर्षाच्या काळात प्रवासादरम्यान कोरोना संसर्गाचा धोका कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. परिवहन मंत्रालयाने शुक्रवारी प्रवाशांना, विशेषत: वृद्ध लोक, गर्भवती महिला, लहान मुले आणि आजारी व्यक्तींनी प्रवास कमी करण्याचे आणि गर्दी टाळण्याचे आवाहन केले.

भारतात स्थिती सामान्यदेशातील कोरोनाची स्थिती सर्वसामान्य असली, तरी विविध राज्यांत कोरोना उपप्रकारांचे रुग्ण आढळत आहेत. मध्य प्रदेशात इंदूरमध्ये ओमायक्रॉनच्या एक्सबीबी.१ या उपप्रकाराने ग्रस्त महिला आढळली आहे. पश्चिम बंगालमध्ये ओमायक्रॉनचा उपप्रकार बीएफ.७ चे चार नवीन रुग्ण आढळून आले आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीनJapanजपान