शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

न्यूझीलंडमध्ये कोरोनाचा रिव्हर्स गेअर, 3 दिवसांत आढळले 30 रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2020 19:52 IST

न्युझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांनीच कोरोना रुग्ण आढळल्याची घोषणा केली आहे. मंगळवारी त्यांनी सांगितले की, अधिकाऱ्यांना ऑकलंडच्या एका घरातील चार सदस्य कोरोनाबाधित सापडले आहेत.

ठळक मुद्दे www.worldometers.info/coronavirus च्या आकडेवाडीनुसार गेल्या 102 दिवसांपासून कोरोनामुक्त असलेल्या न्यूझीलंडमध्ये 3 दिवसांत 30 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे, 26 ऑगस्टपर्यंत न्यूझीलंडमध्ये लॉकडाऊन पुकारण्यात आलाय.  

ब्राझील - कोरोना महामारीवर विजय मिळविल्यानंतर 100 दिवस एकही कोरोना पेशंट न सापडल्याने जगभरात न्युझीलंडचा स्तुती होऊ लागली होती. मात्र, अवघ्या दोन दिवसांनीच न्युझीलंडवर पुन्हा कोरोनाचे संकट दाटले असून ऑकलंडमध्ये चार नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. तर, न्यूझीलंडमध्ये कोरोनाने रिव्हर्स गेअर टाकल्याचं दिसून येतंय. कारण, तीन दिवसांतच न्यूझीलंडमध्ये कोरोनाचे 30 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे, न्यूझीलंड सरकारपुढे कोरोनामुक्तीचे आव्हान उभे ठाकले आहे. 

न्युझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांनीच कोरोना रुग्ण आढळल्याची घोषणा केली आहे. मंगळवारी त्यांनी सांगितले की, अधिकाऱ्यांना ऑकलंडच्या एका घरातील चार सदस्य कोरोनाबाधित सापडले आहेत. त्यांना कोरोना कसा झाला याबाबत काहीच माहिती मिळालेली नाही. देशात 102 दिवसांनंतर स्थानिक संक्रमण झाले आहे. त्यानंतर, आणखी रुग्ण सापडले असून ही रुग्णसंख्या 30 वर पोहोचली आहे. त्यामुळे, न्यूझीलंडमध्ये 12 दिवसांचा लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे.  

पंतप्रधान म्हणाल्या, न्युझीलंडचे सर्वात मोठे शहर ऑकलंड बुधवारी मध्यरात्रीपासून शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत तिसऱ्या टप्प्यातील अलर्टवर ठेवण्यात आले आहे. याचाच अर्थ लोकांना घराबाहेर पडण्यावर बंदी आहे. तसेच बार आणि अन्य अनेक व्यवसाय बंद ठेवण्यात येणार आहेत. तीन दिवस परिस्थितीवर लक्ष ठेवले जाणार आहे. या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेतला जाणार आहे. याद्वारे आम्ही त्या कुटुंबाला कोरोना एवढ्या कालावधीनंतर कसा झाला याचा शोध घेणार आहोत. ही माहिती गोळा करणे खूप कठीण आहे, हे माहिती असल्याचे त्या म्हणाल्या. 

पीएम जेसिंडा यांनी सांगितले की, एवढ्या मोठ्या कालावधीनंतर पुन्हा कोरोनाचे रुग्ण सापडतील याची अपेक्षा नव्हती. मात्र, त्यासाठी आम्ही तयारी केली होती. ऑकलंडमध्ये प्रवासावर प्रतिबंध लावण्यात आले आहेत. जे लोक तिथे राहतात आणि घरी जात आहेत त्यांना अडविले जाणार नाही. शुक्रवारपासून लॉकडाऊन वाढविले जाईल. दुसऱ्या टप्प्यात समारंभांना 100 व्यक्तींना परवानगी दिली जाईल. त्यांना सोशल डिस्टन्सिंग गरजेचे आहे. 

जगभरात 2 कोटी

जगभरात कोरोना व्हायरसची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या वाढून 2 करोड़ 10 लाख 77 हजार 917 पर्यंत पोहोचली आहे. त्यापैकी, 1 कोटी 39 लाख 10 हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर, 7 लाख 57 हजार 674 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  www.worldometers.info/coronavirus च्या आकडेवाडीनुसार गेल्या 102 दिवसांपासून कोरोनामुक्त असलेल्या न्यूझीलंडमध्ये 3 दिवसांत 30 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे, 26 ऑगस्टपर्यंत न्यूझीलंडमध्ये लॉकडाऊन पुकारण्यात आलाय.  

टॅग्स :New Zealandन्यूझीलंडcorona virusकोरोना वायरस बातम्या