शहरं
Join us  
Trending Stories
1
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
2
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
3
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
4
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
5
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
6
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
7
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
8
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
9
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
10
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
11
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
12
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
13
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
14
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
15
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
16
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
17
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
18
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
19
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
20
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल

लहान मुलांसाठी लवकरच कोरोना प्रतिबंधक लस, फायझर कंपनीची तयारी; अमेरिकेत परवानगीसाठी प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 06:10 IST

फायझरची लस १२ ते १५ वर्षे वयोगटासाठी वापरण्यास अमेरिकेचे अन्न व औषध प्रशासन पुढील आठवड्याच्या प्रारंभी परवानगी देण्याची शक्यता आहे.

वॉशिंग्टन : कोरोना साथीचा लहान मुलांनाही मोठा धोका आहे हे लक्षात घेता २ ते ११ वर्षे वयोगटातील मुलांसाठी आपल्या लसीचा आपत्कालीन वापर करता यावा याकरिता फायझर कंपनी अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासन येत्या सप्टेंबर महिन्यात अर्ज करणार आहे. त्याला तातडीने मंजुरी मिळेल, अशी फायझरला अपेक्षा आहे.

त्याशिवाय १६ ते ८५ वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी लसीच्या आपत्कालीन वापराकरिता मंजुरी मिळविण्यासाठी फायझर कंपनी या महिन्यात अन्न व औषध प्रशासनाकडे अर्ज करणार आहे. या लसीच्या मानवी चाचण्यांचा अहवाल येत्या ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभी हाती येणार आहे. गरोदर महिलांसाठी ही लस किती सुरक्षित आहे, याची माहितीही या अहवालातून मिळू शकेल.

फायझरची लस १२ ते १५ वर्षे वयोगटासाठी वापरण्यास अमेरिकेचे अन्न व औषध प्रशासन पुढील आठवड्याच्या प्रारंभी परवानगी देण्याची शक्यता आहे. फायझर-बायोएनटेक या कंपन्यांनी प्रौढ व्यक्तींसाठी संयुक्तरित्या तयार केलेल्या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी गेल्या डिसेंबरमध्ये परवानगी मिळाली होती. इतर वयोगटांच्या वापरासाठी परवानगी मिळाली की ही लस कंपनी थेट ग्राहकांना विकू शकेल. परवानगीची प्रक्रिया पूर्ण व्हायला अजून काही महिने लागतील. 

डीआरडीओचे औषध दोन दिवसांत बाजारात- कोरोनावरील उपचारांसाठी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) विकसित केलेले ‘२ डेओक्सी डी ग्लुकोज’ (२ डीजी) हे औषध १२ मेपर्यंत बाजारात उपलब्ध होईल, असे डीआरडीओचे अध्यक्ष जी. सतीश रेड्डी यांनी रविवारी सांगितले. - याच्या आपत्कालीन वापराला औषध महानियंत्रकांनी (डीसीजीए) नुकतीच मंजुरी दिली आहे. - सुरुवातीला याच्या १० हजार मात्रा बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. डीआरडीओ आणि डॉ. रेड्डीज लॅब यांनी या औषधाची निर्मिती केली आहे.

कोल्हापूर -बालकल्याण संकुलात १४ मुलींना बाधा- कोल्हापूरमधील बालकल्याण संकुलमधील १४ मुली रविवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या. त्यांना पालिकेच्या कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी भरती केले आहे.  - कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक असल्याचा अंदाज दोन दिवसांपूर्वी वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केला होता. कोल्हापुरातील बालकल्याण संकुल मध्ये समाजातील अनाथांचे संगोपन केले जाते. 

‘लस घेण्याबाबत संभ्रमावस्था संपेल’ जॉन हॉपकिन्स विद्यापीठातील संशोधक डॉ. रूपाली लिमये यांनी सांगितले की, फायझरने बनविलेल्या लसीला इतर वयोगटांतील लोकांच्या वापराकरिताही अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने परवानगी दिल्यास काही गोष्टी साध्य होण्यास मदत होणार आहे. कोरोना लस घ्यायची की नाही याबाबत जे आजही संभ्रमावस्थेत आहेत त्या लोकांचा लस घेण्याबाबतचा विचार या परवानगीमुळे बळकट होईल. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिकाUSअमेरिका