शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Corona new Variant: इस्रायलमध्ये आढळला कोरोनाचा नवीन व्हेरिएंट, काय आहेत याची लक्षणे..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 20:12 IST

Corona new Variant: कोरोना विषाणूचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनच्या दोन सब-व्हेरिएंटशी संबंधित आहे. हे दोन सब-व्हेरिएंट BA.1 आणि BA.2 म्हणून ओळखले जातात.

Corona new Variant: जगभरात पुन्हा एकदा कोरोना विषाणूची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. चीनमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून दररोज 3 हजारांहून अधिक प्रकरणे नोंदवली जात आहेत. एकीकडे चीनमध्ये कोरोनाचा आकडा झपाट्याने वाढत आहे तर दुसरीकडे इस्रायलमध्ये कोरोनाचा नवीन  व्हेरिएंट सापडला आहे.

बुधवारी इस्रायलमध्ये कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटची दोन प्रकरणे समोर आली आहेत. आता या नवीन व्हेरिएंटवर काय प्रतिक्रिया द्यायची हे कुणालाच समजत नाहीये. चीनमध्ये कोविडची प्रकरणे झपाट्याने वाढत असताना हा प्रकार आढळून आला आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत इस्रायलमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नवीन प्रकारांवर जागतिक आरोग्य संघटनेकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

नवीन व्हेरिएंट काय आहे?मीडिया रिपोर्टनुसार, कोरोना विषाणूचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनच्या दोन सब-व्हेरिएंटशी संबंधित आहे. हे दोन सब-व्हेरिएंट BA.1 आणि BA.2 म्हणून ओळखले जातात. नवीन प्रकारातून पॉझिटिव्ह आढळलेले दोन लोक इस्रायलमधील बेन गुरियन विमानतळावर आले होते. या दोन्ही प्रवाशांच्या तपासणीत कोरोनाचे नवीन प्रकार आढळून आले आहेत.

नवीन प्रकारांची लक्षणे काय आहेत?कोरोनाच्या नवीन प्रकाराने संसर्ग झालेल्या लोकांमध्ये ताप, डोकेदुखी आणि मस्क्यूलर डिस्ट्रोफीची सौम्य लक्षणे दिसून आली आहेत. कोरोनाच्या नवीन प्रकारातील रुग्णांना कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय सुविधेची गरज नाही, ही दिलासादायक बाब आहे. इस्रायलचे एपिडेमिक रिस्पॉन्स चीफ सलमान जरका म्हणाले की, दोन लोकांमध्ये आढळलेला कोरोनाचा नवीन प्रकार गंभीर नाही. रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही.

इस्रायलमध्येच कोरोनाचा प्रकार विकसित झाला?इस्रायलच्या आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे की, नवीन प्रकारावर संशोधन सुरू आहे. आरोग्य मंत्रालयाचे महासंचालक नचमन ऍश म्हणतात की, कोरोनाचे नवीन प्रकार इस्रायलमध्येच उद्भवले असावे? विमानात चढण्यापूर्वी दोन्ही प्रवाशांना संसर्ग झाल्याचीही शक्यता आहे. इस्रायलमध्ये कोरोनाचे नवीन प्रकार आढळून आल्यानंतर आरोग्य तज्ज्ञांनी तो झपाट्याने पसरण्याची भीती व्यक्त केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जगभरात कोरोनाचे रुग्ण वाढू शकतात.

चीनमध्ये कोरोनाचा आलेख झपाट्याने वर जात आहेकोरोनामुळे चीनमधील परिस्थिती बिकट होत चालली आहे. फेब्रुवारी 2020 नंतरची सर्वात वाईट परिस्थिती सांगितली जात आहे. चीनमध्ये काही दिवसांपासून 3 हजारांहून अधिक नवीन प्रकरणे समोर येत आहेत. वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर चीनमधील अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. चीनसोबतच हाँगकाँग, दक्षिण कोरियासह आफ्रिकन आणि युरोपीय देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIsraelइस्रायल