शहरं
Join us  
Trending Stories
1
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
2
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
3
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
4
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
5
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
6
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
7
७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
8
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर
9
जखमी नवजोत सिंह आणि त्यांच्या पत्नीला २२ किलोमीटर दूर असलेल्या हॉस्पिटलमध्ये का घेऊन गेली गगनप्रीत? झाला खुलासा!
10
६० मुस्लीम देशांच्या बैठकीत पाकिस्ताननं दिला 'इस्लामिक नाटो'चा प्रस्ताव; भारतासाठी किती चिंताजनक?
11
PM Modi Turns 75: वयाची ७५ वी अमृत महोत्सव म्हणून का साजरी केली जाते? सनातन धर्मात सापडते उत्तर 
12
ind vs oman: ओमानविरुद्धच्या सामन्याआधी भारतीय खेळाडूंनी मैदानात गाळला घाम, पाहा फोटो!
13
कॅनडातील वाणिज्य दूतावास ताब्यात घेणार; खलिस्तान समर्थकांची भारताला खुली धमकी...
14
"नक्कीच जुळं होणार", प्रिया बापटचा बेबी बंपचा व्हिडीओ पाहून चाहत्यांच्या कमेंट्स
15
२० वर्षांनंतर घेता येणार स्वेच्छा निवृत्ती, पण पूर्ण पेन्शनसाठी एवढ्या वर्षांची असणार अट
16
PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट कोण? राजकीय सभांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये केलंय काम
17
Urban Company IPO Listing: ५६ टक्क्यांचं लिस्टिंग गेन, ₹१०३ च्या शेअरची धमाकेदार एन्ट्री; गुंतवणूकदार मालामाल
18
Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण
19
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
20
PM Modi Birthday: जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 

कोरोनामुळे जगात आतापर्यंत 40 लाख नागरिकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2021 05:57 IST

देशामध्ये उपचार घेणाऱ्यांत घट; ७३ दिवसांतील कमी प्रमाण

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : जगामध्ये कोरोनामुळे आतापर्यंत ४० लाखांहून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे, तर १७ कोटी ८२ लाखांपेक्षा जास्त रुग्ण आहेत. भारतामध्ये आठ लाखांहून कमी रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या ७३ दिवसांतले हे सर्वात कमी प्रमाण आहे. गेल्या चोवीस तासांत ६२ हजार नवे रुग्ण आढळले.

जगातील एकूण रुग्णांपैकी १६ कोटी २७ लाखजण बरे झाले; तर १ कोटी १६ लाख रुग्ण उपचार घेत आहेत. त्यातील ८२ हजार लोकांची प्रकृती अतिशय गंभीर आहे. ब्रिटन, अमेरिकेसारख्या देशांमधे नवे रुग्ण व मृत्यूच्या संख्येत घट होत आहे. कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर वर्षभरातच या संसर्गाने २ लाख लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाली असून, पुढच्या १६६ दिवसांत आणखी २ लाखांचा बळी गेला. जागतिक स्तरावर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांपैकी ५० टक्के लोक अमेरिका, ब्राझील, भारत, रशिया, मेक्सिको या पाच देशांतील आहेत.

भारतामध्ये गेल्या चोवीस तासांत ६२ हजार ४८० नवे रुग्ण सापडले, तर त्यापेक्षा अधिक म्हणजे ८८ हजार ९७७ जण बरे झाले व १५८७ जणांचा मृत्यू झाला. सलग ३६ व्या दिवशी नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. २ कोटी ९७ लाख ६२ हजार ७९३ रुग्णांपैकी २ कोटी ८५ लाख ८० हजार ६४७ जण बरे झाले. आतापर्यंत ३ लाख ८३ हजारजणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एकूण रुग्णांच्या तुलनेत बरे झालेल्यांचा आकडा ९६.०३ टक्के आहे. ७ लाख ९८ हजार ६५६ जणांवर उपचार सुरू आहेत.

पाच राज्यांतील ६९%n    देशातील कोरोना रुग्णांपैकी ६९.७ टक्के रुग्ण महाराष्ट्र, तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक या पाच राज्यांतील आहेत. n    दर आठवड्याचा व दररोजचा संसर्गदर अनुक्रमे ३.८० टक्के व ३.२४% आहे. 

लसीचे दिले २६.८६ कोटी डोसदेशात आतापर्यंत कोरोना लसीचे २६.८६ कोटींपेक्षा अधिक डोस देण्यात आले. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च  या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ३८ कोटी ७१ लाख ६७ हजार ६९६ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या