शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका, US न्यायालयानं टॅरिफ निर्णय ठरवला अवैध; काय म्हणाले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष?
2
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस, सरकार काय तोडगा काढणार?
3
आजचे राशीभविष्य, ३० ऑगस्ट २०२५: कौटुंबिक वातावरण आनंदी असेल, वाणीवर संयम ठेवावा !
4
VIDEO: फुल्ल ऑन राडा... नितीश राणाला भिडला दिग्वेश राठी, खेळाडू मध्ये पडले म्हणून नाहीतर...
5
​बीडजवळ काळ बनून आला ट्रक; भीषण अपघातात ६ भाविकांचा जागीच मृत्यू
6
मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांचे खाण्यापिण्याचे हाल; गाडीतच स्वयंपाक, तिथेच जेवण
7
फडणवीसांचे सरकार पाडण्यासाठी अजित पवारांचे नेते सामील, लक्ष्मण हाके यांचा आरोप
8
पूजा कमी नौटंकीच जास्त! गणपतीसमोर पार्टीत नाचतात तसे नाचले, अर्जुन बिजलानीच्या घरातील व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले
9
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
10
महाराष्ट्रात ३४ हजार कोटींची गुंतवणूक; ३३ हजार रोजगार
11
आंदोलनादरम्यान, पोलिसांच्या मदतीला पाऊस आला धावून...
12
...आणि पोलिसांचा थेट जरांगे यांना व्हिडीओ कॉल!
13
मराठा बांधवांनो, फक्त १० रुपयांत मुंबईत राहा, अशी आहे शक्कल
14
मुसळधारेतही आंदोलकांचा उत्साह कायम, शहर, उपनगरात ठिकठिकाणी पावसाची जोरदार हजेरी; रात्री उशिरापर्यंत आझाद मैदानात गर्दी
15
उर्जित पटेल आयएमएफच्या कार्यकारी संचालकपदी
16
मुसळधार पावसाचा सामना करत मुंबईमध्ये लोटला 'मराठा'सागर
17
विजयाशिवाय मागे हटणार नाही, सरकारने सहकार्य केले, आपणही सहकार्य करू : जरांगे पाटील
18
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
19
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
20
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!

CoronaVirus: 'कोरोना'लाही कोरोनाचा फटका; उत्पादन थांबवण्याचा कंपनीचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2020 17:13 IST

Coronavirus देशात आरोग्य आणीबाणी लागू झाल्यानं कंपनीचा निर्णय

मेक्सिको सिटी: कोरोनाचा धोका वाढल्यामुळे मेक्सिकोमध्ये आरोग्य आणीबाणी लागू झाली आहे. त्यामुळे ग्रुपॉ मॉडलू कंपनीनं कोरोनासह पॅसिफिको आणि मॉडलू या ब्रँड्सचं उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मेक्सिको सरकारनं केवळ अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच कोरोना बिअरचं उत्पादन बंद करण्याचा निर्णय ग्रुपॉ मॉडलू कंपनीनं घेतला आहे. ३० एप्रिलपर्यंत कोरोनाचं उत्पादन बंद ठेवण्यात येणार आहे. आम्ही उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला असून तशा सूचना संबंधित विभागांना दिल्या आहेत, अशी माहिती कंपनीनं प्रसिद्धीपत्रातून दिली आहे. येत्या काही दिवसांत उत्पादन हळूहळू पूर्णपणे बंद करण्यात येईल, असंदेखील कंपनीनं स्पष्ट केलं आहे. पुढील काही दिवस केवळ शेती आणि वैद्यकीय सेवा सुरू ठेवण्याचे आदेश मेक्सिको सरकारनं दिले आहेत. सरकारनं परवानगी दिल्यास ७५ टक्के कर्मचाऱ्यांच्या मदतीनं उत्पादन सुरू ठेवू, असं ग्रुपॉ मॉडलूनं म्हटलं आहे.बिअर निर्मिती क्षेत्रातील मेक्सिकोमधील आणखी एक मोठी कंपनी असलेल्या हाईनकननंही तकेट आणि डॉस इक्वस ब्रँड्सचं उत्पादन बंद करण्याची शक्यता आहे. स्थानिक माध्यमांनी याबद्दलचं वृत्त दिलं आहे. मात्र अद्याप तरी कंपनीनं याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. हाईनकनचं उत्पादन मेक्सिकोच्या उत्तरेकडील राज्यात होतं. या राज्यातल्या सरकारनंही बिअरचं उत्पादन आणि वितरण थांबवणार असल्याची घोषणा केली. यानंतर ग्राहकांची तारांबळ उडाली आणि बिअर खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी झाली. चीनमधून कोरोना जगभरात पसरल्यानंतर कोरोना बिअर मोठ्या प्रमाणात चर्चेत आली. तिच्यावर विनोद आणि मीम्सदेखील तयार झाले. सोशल मीडियात हे मीम्स व्हायरलदेखील झाले होते. यानंतर अमेरिकेतील कोरोना बिअरची विक्री ४० टक्क्यांनी कमी झाली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या