शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
2
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
3
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
4
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
5
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
6
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
7
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
8
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
9
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
10
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
11
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
12
VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी
13
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
14
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
15
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
16
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे आयोजित रक्तदान कार्यक्रमाने रचले २ विश्वविक्रम
17
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
18
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
19
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
20
बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?

कोपा अमेरिका फुटबॉल : अर्जेंटिनाला फायनलमध्ये ‘तिखट’ आव्हान

By admin | Updated: June 23, 2016 18:37 IST

गोलच्या जोरावर पावसामुळे बाधित झालेल्या सेमी फायनलमध्ये कोलंबियाला २-0 ने हरवून कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला

ऑनलाइन लोकमतशिकागो, दि. 23 - गत चॅम्पियन चिलीने पूर्वार्धात केलेल्या दोन जबरदस्त गोलच्या जोरावर पावसामुळे बाधित झालेल्या सेमी फायनलमध्ये कोलंबियाला २-0 ने हरवून कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम फेरीत त्यांना सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन बनण्यास उत्सुक असलेल्या अर्जेंटिनाशी भिडावे लागणार आहे. रविवारी न्यू जर्सी येथील ईस्ट रुदरफोर्ड मैदानावर या दोन बलाढ्य संघामध्ये अमेरिका खंडाचा बादशाह बनण्यासाठी झुंज रंगणार आहे.तत्पूर्वी, अर्जेंटिनाने यजमान अमेरिकेला ४-0 ने एकतर्फी हरवून अंतिम फेरीत धडक मारली. विशेष म्हणजे सलग दुसऱ्यांदा चिली आणि अर्जेंटिना कोपा अमेरिका स्पर्धेच्या किताबासाठी अंतिम फेरीत झुंजणार आहेत. गेल्यावेळी चिलीने अर्जेंटिनाला ४-१ असे हरवून अजिंक्यपद मिळवले होते.एरानगुएजचा पहिला धमाकाचिलीचा मिडफिल्डर चार्ल्स एरानगुएजने सातव्या मिनिटाला पहिला गोल ठोकून १-0 अशी आघाडी मिळवून दिली. कोलंबियाच्या मिडफिल्डर कुआड्राडो याचा भरकटलेला हेडर थेट एरानगुएज याच्याजवळ पोहचला. त्याने या संधीचा फायदा उठवत कोलंबियाचा उपकर्णधार आणि गोलकिपर डेव्हिड ओसपिना याला चकवून गोल डागला. यानंतर अकराव्या मिनिटाला जोस पेड्रो फ्यूनजालिदाने दुसरा गोल नोंदवून आघाडी २-0 अशी केली. गोलपोस्टला धडकून परत आलेल्या चेंडूला पेड्रोने चपळाईने पुन्हा गोलपोस्टमध्ये धाडले. यामुळे कोलंबिया प्रचंड दबावात आला. त्यानंतर उत्तरार्धात पावसामुळे खेळ दोन तासासाठी थांबविण्यात आला. पाउस ओसरल्यानंतर दोन्ही संघ पुन्हा मैदानात उतरले. परंतु 0-२ ने पिछाडीवर पडलेल्या कोलंबियन संघाला फारशी करामत दाखवता आली नाही. ५६ व्या मिनिटाला कोलंबिया संघाला गोल करण्याची संधी होती, परंतु त्यांना ती साधता आली नाही. मिडफिल्डर आर्टुरो विडाल आणि मार्सेलो डियाज या दोन खेळाडूंशिवाय मैदानात उतरलेल्या चिलीला अर्ध्या तासानंतर पेड्रो हर्नांडिस जखमी झाल्याने आणखी एका खेळाडूला मुकावे लागले. कोलंबियाकडून जेम्स रॉड्रिग्जच्या दोन चांगल्या प्रयत्नांना गोलमध्ये रुपांतरीत करताना न आल्याने त्यांचा गोलफलक कोराच राहिला. कोलंबियाला आता तिसऱ्या स्थानासाठी प्लेआॅफ लढतीत अमेरिकेशी शनिवारी लढावे लागेल.---------------------------------आम्ही चांगला खेळ केला परंतु चिलीचा संघ वरचढ ठरला. आम्ही सामन्यात पुनरागमन करु अशी आम्हाला अपेक्षा होती, पण परिस्थिती आमच्या विरुध्द होती. -जुआन कुआड्राडो, मिडफिल्डर, कोलंबिया