शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

'नवसंजीवनीसाठी धन्यवाद'; हनुमानाचं छायाचित्र शेअर करत ब्राझीलनं मानले भारताचे आभार

By जयदीप दाभोळकर | Updated: January 23, 2021 08:12 IST

इतर देशांची मदत करून भारत खरा मित्र सिद्ध झाला, अमेरिकेकडूनही भारताचं कौतुक

ठळक मुद्देभारतानं ब्राझीललाही केला कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा पुरवठाअमेरिकेनंही केलं भारताचं कौतुक

काही दिवसांपूर्वी भारतानं सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेकच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसींच्या वापरासाठी परवानगी दिली. त्यांतर देशभरात लसीकरणाची मोहीम सुरू करण्यात आली. असं असलं तर भारत अन्य देशांच्या मदतीसाठीही धावून गेला आहे. शुक्रवारपासून भारतां अन्य देशांना कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा पुरवठा करण्यास सुरूवात केली. भारतानं ब्राझीलसाठीही लसी पाठवल्या आहेत. यानंतर ब्राझीलचेराष्ट्राध्यक्ष जेयर बोलसोनारो यांनी भारताचे आभार मानले आहेत. त्यांनी हनुमानाचं संजीवनी बुटी घेऊन जातानाचं छायाचित्र शेअर करत भारताचे आभार मानले आहेत. 

कोरोना प्रतिबंधात्मक लसींची खेप ब्राझीलला पोहोचल्यानंतर ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेयर बोलसोनारो यांनी आनंद व्यक्त केला. भारतानं ब्राझीलला तब्बल २० लाख डोस पाठवले आहेत. बोलसोनारो यांनी संजीवनी बुटी घेऊन जाणाऱ्या हनुमानाचं छायाचित्र शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. "जागतिक समस्येला दूर करण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांमध्ये सामील एक मोठा सहकारी भेटल्याबद्दल ब्राझीलला अभिमान वाटत आहे. ब्राझीलला कोरोना प्रतिबंधात्मक लसींची निर्यात करण्यसाठी धन्यवाद," असं ट्वीट ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बोलसोनारो यांनी केलं आहे. तसंच त्यांनी हिंदीमध्येदेखील धन्यवाद लिहीत भारताचे आभार मानले आहेत. दुसऱ्या देशांना लसीचा पुरवठा करत असल्याबाबत अमेरिकेनंही भारताचं कौतुक केलं आहे. "जागतिक आरोग्य सेवेमध्ये भारत साकारत असेलेल्या भूमिकेचं आम्ही स्वागत करत आहोत. भारतानं दक्षिण आशियामध्ये कोरोना लसीची खेप पाठवली आहे. भारताकडून मालदीव, भूतान, बांगलादेश आणि नेपाळला मोफत लस पाठवण्याची सुरू झालेली मोहीम दुसऱ्यांपर्यंत नक्की पोहोचेल. जागतिक समुदायाच्या मदतीसाठी आपल्या औषधांचा उपयोग करत भारत एक खरा मित्र सिद्ध झाला आहे," असं म्हणत अमेरिकेनंही भारताचं कौतुक केलं आहे.  समोर आलेल्या माहितीनुसार भारत ब्राझील आणि मोरक्कोला कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे २०-२० लाख डोस कमर्शिअल सप्लाय अंतर्गत पाठवत आहे. म्यानमारलाही १५ लाख डोस पाठवण्यात आले आहे. याव्यतिरिक्त सेशल्सला ५० हजार आणि मॉरिशसला १ लाख डोस पाठवले जाणार आहेत.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याBrazilब्राझीलPresidentराष्ट्राध्यक्षIndiaभारतprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदी