शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: लाखो कोंबड्यांवर पुन्हा संक्रांत; आता वेगळंच कारण ठरतंय कर्दनकाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 18:39 IST

coronavirus कुक्कुटपालन उद्योगावर पुन्हा एकदा संकट

डेलवर: चिकन खाल्ल्यानं कोरोना होतो, अशी अफवा पसरल्यानं काही दिवसांपूर्वी देशातला कुक्कुटपालन व्यवसाय अडचणीत आला. मागणीच नसल्यानं कोंबडी, अंड्यांचे दर अतिशय कमी झाले. त्यामुळे अनेक व्यवसायिक अडचणीत सापडले. हे संकट काही दिवसांनंतर दूर झालं. मात्र आता एक वेगळीच अडचण अमेरिकेतल्या कुक्कुटपालन व्यवसायासमोर उभी राहिली आहे. विशेष म्हणजे ही समस्यादेखील कोरोनाशी संबंधित आहे.अमेरिकेच्या डेलवरमधली चिकन कंपनी जवळपास २० लाख कोंबड्यांची कत्तल करणार आहे. या कोंबड्यांची हत्या मांस विक्रीसाठी होणार नसून कर्मचाऱ्यांची कमतरता हे यामागचं प्रमुख कारण आहे. कोरोनामुळे बरेचसे कर्मचारी वर्ग अनुपस्थित राहत असल्यानं कंपनीची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे बाजारात चिकनचा तुटवडा निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. कोरोनाचा कहर कायम असल्यानं अमेरिकेतलं अनेक उद्योग बंद ठेवण्यात आले आहेत. चिकन पुरवठा करणाऱ्या कंपन्या सुरू असल्या तरीही काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर काही ट्रक चालक कोरोना हॉटस्पॉटमध्ये जाण्यास उत्सुक नाहीत. याशिवाय वातानुकूलित कंटेनर्सदेखील वाहतुकीसाठी उपलब्ध नाहीत.कोरोनामुळे आलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर चिकन कंपनीनं कुक्कुटपालन उद्योजकांना पत्र पाठवलं आहे. कोरोनामुळे जेमतेम ५० टक्के कर्मचारीच कामावर येत आहेत. त्यामुळे कार्यक्षमता कमी झाली आहे. कोंबड्यांची संख्या जास्त झाल्यानं त्यांचा सांभाळदेखील शक्य नाही. त्यामुळे कोंबड्यांची कत्तल करण्याचा निर्णय घ्यावा लागत असल्याचं कंपनीनं पत्रात नमूद केलं आहे. यापुढे कत्तल करण्यासाठी आणल्या जाणाऱ्या कोंबड्यांची संख्या कमी केली जाईल. त्या दृष्टीनं घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी सुरू करण्यात आल्याचं कंपनीनं पत्रात स्पष्ट केलं आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिका