शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

OMG! मादागास्कर बेटांवर सापडला डायनासोर काळातील जिवंत मासा; 42 कोटी वर्षे जुनी प्रजाती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2021 13:36 IST

Coelacanths fish found in Madagascar Sea: शिकाऱ्यांनी शार्क माशाला पकडण्यासाठी एक खास जाळ्याचा वापर केला होता. त्या जाळ्यामध्ये हा मासा सापडला आहे.

Coelacanths fish found: हिंदी महासागरात असलेल्या मादागास्कर बेटांवर शार्क माशाची शिकार करणाऱ्या मच्छीमारांना डायनासोर काळात हजारो वर्षांपूर्वी बेपत्ता झालेला (fossil fish) जिवंत मासा सापडला आहे. धक्कादायक म्हणजे या माशाला चार कल्ले आहेत. या माशाची प्रजाती जवळपास 42 कोटी वर्षे जुनी आहे.  (fossil fish that predates dinosaurs and was thought to have gone extinct has been found alive in the West Indian Ocean off the coast of Madagascar.)

या भयावह माशाला Coelacanth नावाने ओळखले जाते. शिकाऱ्यांनी शार्क माशाला पकडण्यासाठी एक खास जाळ्याचा वापर केला होता. त्या जाळ्यामध्ये हा मासा सापडला आहे. हे मच्छीमार शिकारी शार्क माशाचे तेल आणि पंख मिळविण्यासाठी खोलवर समुद्रात जाळे टाकतात. ही अशी ठिकाणे असतात जिथे शार्क मासे एकत्र येतात आणि तिथे त्यांना पकडले जाते. हे जाळे समुद्रात 328 फुट ते 492 फुट आतमध्ये जाऊ शकतात. 

मादागास्करमध्ये सापडलेली ही प्रजाती कित्येक वर्षे जुनी आहे, असे म्हटले जात आहे. या माशाला 1938 पर्यंत लुप्त झाल्याचे मानले जात होते. आता पुन्हा हा मासा सापडल्याने खळबळ उडाली आहे. सांगितले जात आहे की, या माशाला 8 पंख आहेत. तसेच तिच्या शरिरावर विशिष्ट अशी धार बनलेली आहे. दक्षिण ऑफ्रिकेच्या जर्नल ऑफ सायन्समध्ये छापून आलेल्या या माशावरील संशोधनात म्हटले आहे की, शार्क माशांच्या शिकारीमुळे Coelacanth माशांच्या अस्तित्वावर धोका निर्माण झाला आहे. 1980 पासून शार्क माशांच्या शिकारीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. या शिकाऱ्यांकडे असणारे जिलनेट एवढे खतरनाक आहेत की, खोल समुद्रातील शार्क माशालादेखील ते आरामात त्यात कैद करू शकतात. 

संशोधकांना आता शार्क माशाचे हे जाळे या अद्भूत माशालाही संपवेल अशी भीती वाटू लागली आहे. मादागास्करमध्ये मोजक्या संख्येने हा मासा राहत आहे. येथील समुद्र या प्रजातीच्या विविध माशांसाठी केंद्र बनला आहे. मात्र, तेथील सरकार या माशांच्या शिकारीवर गंभीर दिसत नाहीय.  

टॅग्स :fishermanमच्छीमार