शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

तीन पश्चिम आफ्रिकन देशांसाठीची विमानसेवा बंद

By admin | Updated: August 29, 2014 02:32 IST

इबोलाच्या दहशतीमुळे आणखी काही विमान कंपन्यांनी या साथीच्या केंद्रस्थानी असलेल्या तीन पश्चिम आफ्रिकन देशांसाठीची विमान उड्डाणे थांबविली आहेत. परिणामी हे देश अधिक एकाकी पडले आहेत.

फ्रीटाऊन : इबोलाच्या दहशतीमुळे आणखी काही विमान कंपन्यांनी या साथीच्या केंद्रस्थानी असलेल्या तीन पश्चिम आफ्रिकन देशांसाठीची विमान उड्डाणे थांबविली आहेत. परिणामी हे देश अधिक एकाकी पडले आहेत. सिएरा लिओनसाठीची विमान उड्डाणे तात्पुरती थांबवावीत ही फ्रान्स सरकारची विनंती एअर फ्रान्सने मान्य केली आहे. त्यामुळे सिएरा लिओनची राजधानी फ्रीटाऊन व शेजारील लायबेरियाच्या मोन्रोव्हाया येथे आता रॉयल एअर मोरोक्कोचे केवळ एकच नियमित उड्डाण उरले आहे. ब्रिटिश एअरवेजने इबोला साथीच्या भीतीमुळे सिएरा लिओन व लायबेरियासाठीची आपली उड्डाणे पुढील वर्षापर्यंत रद्द केल्याच्या दुसऱ्याच दिवशी एअर फ्रान्सनेही या देशांपासून स्वत:ला वेगळे केले. ब्रुसेल्स एअरलाईन्सची लायबेरिया, सिएरा लिओनसाठी चार, तर गिनीसाठी तीन उड्डाणे होती. मात्र, यातीलही अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. शनिवारी आपण पुढील वेळापत्रक निश्चित करणार असल्याचे या कंपनीने म्हटले आहे. प्रवाशांच्या मागणीवरून या कंपनीने इबोलाग्रस्त देशांसाठी तीन स्वतंत्र उड्डाणे करण्याचे मान्य केले आहे. या विमानांद्वारे संयुक्त राष्ट्रसंघाचे ४० टन वैद्यकीय साहित्यही नेण्यात येणार आहे. इबोलाग्रस्त देशांसाठीची विमान उड्डाणे रद्द करणाऱ्या विमान कंपन्यांवर संयुक्त राष्ट्रसंघाचे इबोलावरील दूत डेव्हिड नाबारो यांनी टीका केली होती. हे देश अधिक एकाकी पडत चालल्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघाला काम करणे कठीण बनले असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, इबोला साथीवर चर्चेसाठी हा विषाणू धुमाकूळ घालत असलेल्या देशातील आरोग्यमंत्र्यांची घानाच्या राजधानीत गुरुवारी बैठक होत आहे. (वृत्तसंस्था)