शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

चिन्मय दास यांच्या जामिनावर ३ डिसेंबरला सुनावणी; देशद्रोहाच्या आरोपाखाली बांगलादेशात अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 22:57 IST

Chinmay Krishna Das Bail Plea, Bangladesh Court: चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेमुळे बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू समाजातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत

Chinmay Krishna Das Bail Plea, Bangladesh Court: 'इस्कॉन'चे चिन्मय कृष्ण दास यांना गेल्या आठवड्यात बांगलादेशात देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. याविरोधात बांगलादेशसह भारतातही निदर्शने होत आहेत. यादरम्यान, चिन्मय दास यांच्या जामीन सुनावणीसाठी न्यायालयाने ३ डिसेंबरची तारीख निश्चित केल्याचे वृत्त आहे. चितगाँव महानगर पोलिसांचे अतिरिक्त उपायुक्त मोफिझ उर रहमान यांनी जामीन सुनावणीबाबत माहिती दिली. मोफिज यांच्या म्हणण्यानुसार, कोर्ट चिन्मय दास यांच्या जामिनावर मंगळवारी सुनावणी करणार आहे. मेट्रोपॉलिटन सत्र न्यायाधीश मोहम्मद सैफ-उल-इस्लाम यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे.

चिन्मय कृष्ण दास यांना सोमवारी अटक करण्यात आली आहे. बांगलादेशची राजधानी ढाका येथील हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून त्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. त्यांना लगेच दुसऱ्या दिवशी चितगाँव न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी त्यांना न्यायालयाने जामीन नाकारला आणि त्यांची तुरुंगात रवानगी केली. यानंतर त्यांच्या समर्थकांनी या अटकेचा तीव्र निषेध करत, निदर्शने सुरु केली. यामुळे सरकारवर दबाव आला असून, चितगाँव न्यायालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, सुनावणीची तारीख आधीच निश्चित करण्यात आली होती. मात्र बुधवार आणि गुरुवारी वकिलांच्या संपामुळे ही घोषणा लांबली. BDNews24 च्या रिपोर्टनुसार, ३ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

३० ऑक्टोबरला देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला...

चिन्मय दास यांच्यासह १९ जणांविरुद्ध ३० ऑक्टोबरला चितगाँवमधील कोतवाली पोलिस ठाण्यात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. चितगाँवच्या न्यू मार्केट भागात हिंदू समुदायाच्या रॅलीदरम्यान बांगलादेशच्या राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. यापूर्वी गुरुवारी इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा चेतना (इस्कॉन) शी संबंधित १७ लोकांची बँक खातीही गोठवण्यात आली.

टॅग्स :BangladeshबांगलादेशHinduहिंदूArrestअटकCourtन्यायालय