शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

MADE IN CHINA! कोरोना विषाणू मानवनिर्मितच, माझ्याकडे पुरावे; चिनी वैज्ञानिकांचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2020 09:23 IST

चीनमधला हा मानवनिर्मित व्हायरस असल्याचा आपण म्हणू शकतो, असे सांगत त्यांनी चिनी सरकारवर ठपका ठेवला. माझ्याकडे याचा पुरावा आहे आणि मी ते सिद्ध करेन.

चीनवर कोरोना विषाणूच्या उत्पत्तीचा सातत्यानं आरोप केला जात आहे. या धोकादायक विषाणूच्या उत्पत्तीबद्दल अमेरिका ते युरोपपर्यंत अनेक देश चीनला दूषणं लावत आहेत. आता चिनी सरकारच्या धमकीनंतरही स्वत: अमेरिकत येणार्‍या चिनी महिला विषाणुशास्त्रज्ञांनी कोरोना विषाणू मानवनिर्मित असल्याचा दावा केला आहे. व्हायरोलॉजिस्ट ली-मेंग यान यांनी सांगितले की, कोरोना व्हायरस मानवनिर्मित असल्याचे सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे पुरेसे पुरावे आहेत, जे ती लवकरच सादर करणार आहे. चीनने या विषाणूबद्दल बरेच काही लपवून ठेवले आहे आणि चीनमधला हा मानवनिर्मित व्हायरस असल्याचा आपण म्हणू शकतो, असे सांगत त्यांनी चिनी सरकारवर ठपका ठेवला. माझ्याकडे याचा पुरावा आहे आणि मी ते सिद्ध करेन.ली-मेंग म्हणाल्या, कोरोना वुहानच्या मांस बाजारातून आलेला नाही, कारण मांस बाजार ही स्मोक स्क्रीन आहे, तर व्हायरस निसर्गाची निर्मिती नाही. जर हा विषाणू वुहानच्या मांस बाजारातून आला नाही, तर मग त्याचा कसा उद्भव झाला. यावर उत्तर देताना ली मेंग म्हणाल्या की, हा धोकादायक विषाणू वुहानच्या प्रयोगशाळेतून आला आहे आणि तो मानवनिर्मित आहे. या विषाणूचा जीनोम सिक्वेन्स हा मानवी फिंगर प्रिंट सारखा आहे आणि त्याच्या आधारे हे सिद्ध होते की हा मानवनिर्मित व्हायरस आहे. कोणत्याही व्हायरसमध्ये मानवी बोटांच्या प्रतिकृतीची उपस्थिती हे सांगण्यास पुरेसे आहे की, तो मनुष्याने उत्पन्न केलेला आहे.ली मेंग म्हणतात, जरी आपल्याकडे जीवशास्त्रचे ज्ञान नाही किंवा आपण ते वाचत नाही, तरीही आपण व्हायरसचे मूळ त्याच्या आकाराद्वारे ओळखण्यास सक्षम आहोत. या दरम्यान त्यांनी चिनी सरकारवर गंभीर आरोप केला की, या धमकीनंतर मी हॉंगकॉंग सोडून अमेरिकेत स्थलांतरित झाले, पण माझी सर्व वैयक्तिक माहिती सरकारी डेटाबेसमधून मिटविली गेली आणि माझ्या सहका-यांना माझ्याबद्दल अफवा पसरविण्यास सांगण्यात आले.ली मेंग म्हणाल्या की, सरकार मला खोटं पाडण्यासाठी विविध युक्त्या वापरत आहे आणि माझ्यावर ठार मारण्याचादेखील आरोप ठेवला आहे, परंतु मी माझ्या ध्येयातून मागे हटणार नाही. कोरोना विषाणूचा अभ्यास करणार्‍या पहिल्या काही वैज्ञानिकांपैकी त्या एक आहेत. डिसेंबर 2019च्या उत्तरार्धात त्यांनी असा दावा केला होता की, विद्यापीठातील त्यांच्या पर्यवेक्षकाद्वारे चीनमध्ये उद्भवलेल्या एसएआरएससारख्या विषयावरील विकृतींचा शोध घेण्यास सांगितले. त्या पुढे म्हणाल्या की, मी प्रत्येक आव्हानाला सामोरे जाण्यास तयार आहे आणि हा विषाणू मानवनिर्मित आहे हे लवकरच सिद्ध करेन. 

टॅग्स :chinaचीन