शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
2
वक्फ कायद्याविरोधात AIMPLB चा 'ब्लॅकआउट' प्लॅन...; हैदराबादमध्ये मुस्लीम नेते-धर्मगुरू एकवटले, ओवेसी म्हणाले आम्ही...!
3
जेनसोलच्या पुण्यातील प्लाँटमध्ये एनएसईचा अधिकारी पोहोचला; होते फक्त तीन मजूर, परिस्थिती पाहून...
4
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...
5
Video : दोन्ही फलंदाज नॉन स्ट्राइक एन्डला! Run Out चा डाव साधल्यावर कोहलीनं 'गॉगल' काढला, अन्...
6
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
7
'हलक्यात घेऊ शकत नाही' चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहितचा मुंबईला इशारा, धोनीबाबत म्हणाला...
8
मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; मल्लिकार्जुन खरगेंचा BJP-JDU युतीवर निशाणा
9
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
10
रणजीत कासलेंना निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती; प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल
11
दररोज ४५ रुपये गुंतवून लखपती व्हा; LIC च्या 'या' योजनेत तुम्हाला विमा आणि बोनसही मिळतो
12
सेक्सटॉर्शन, तरुणाचे अश्लील फोटो व्हायरल ! महिलेसह दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा
13
अजित पवारांचे हेलिकॉप्टर बिघडले, राष्ट्रवादीचा मेळावा रद्द; कार्यकर्त्यांमध्ये रंगली वेगळीच चर्चा
14
विजेच्या धक्क्याने तडफडत होता मुलगा, लोकांची जवळ जाण्याची होत नव्हती हिंमत, तेवढ्यात एक तरुण धावला आणि...  
15
१० हजारांच्या आत AI, ५जी फोन; सेल्फी कॅमेरा ८ मेगापिक्सलचा पण चकीत केले; कसा आहे A95?
16
“जनतेने नाकारल्यामुळे ठाकरे बंधूंना आता एकत्र येण्याची गरज वाटतेय”; भाजपाचा खोचक टोला
17
इकडून सोने टाका अन् तिकडून पैसे काढा.. सोने खरेदी-विक्रीसाठी बाजारात आलंय ATM
18
शर्मिष्ठा राऊतच्या घरी पाळणा हलला! लग्नानंतर ४ वर्षांनी अभिनेत्री झाली आई, थाटामाटात केलं बारसं
19
भारतीय संशोधकांनी लावलेल्या शोधाचा चीनने घेतला लाभ, अमेरिका, रशियाही अवाक्, भारताने संधी दवडली  
20
दुर्दैवी! टॅम्पोचा अपघात; मदत करण्याऐवजी तेल लुटण्यासाठी उडाली झुंबड, क्लिनरचा जागीच मृत्यू

शाहबाज सरकारला धक्का; पाकिस्तानात तैनात होणार चीनी सुरक्षा दल, कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 20:02 IST

Chinese Security In Pakistan: चीनने तीन खासगी कंपन्यांना याची जबाबदारी सोपवली आहे.

China Deployed Security : काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात ट्रेन हायजॅक करण्यात आली होती. या घटनेमुळे पाकिस्तान-बलुचिस्तानमधील वाद पुन्हा जगासमोर आला. याच पार्श्वभूमीवर चीनने एक मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानमध्ये चिनी अभियंते आणि मजुरांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे चीनने आपल्या प्रकल्पांच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानमध्ये खाजगी सुरक्षा कर्मचारी तैनात केले आहेत. 

चीनने अलीकडेच पाकिस्तानमधील CPEC प्रकल्पात काम करत असलेल्या आपल्या अभियंते आणि कामगारांच्या सुरक्षेसाठी करार केला आहे. अलीकडेच बलुचिस्तानमध्ये जाफर एक्स्प्रेसचे अपहरण आणि लष्कराच्या बेसवर झालेल्या हल्ल्यानंतर चीनने हे पाऊल उचलले आहे. 

चीनने संयुक्त सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी त्यांच्या तीन खाजगी कंपन्यांवर सोपवली आहे Dewe Security Frontier Service Group, China Overseas Security Group आणि Huaxin Zhongshan Security Service या तीन कंपन्यांवर सुरक्षेची जबाबदारी असेल. पहिल्या टप्प्यात सिंध प्रांतातील दोन CPEC ऊर्जा प्रकल्पांवर 60 चीनी सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत. हे सैनिक सुरक्षेत गुंतलेल्या पाकिस्तानी लष्करावर नजर ठेवतील.

चीनचा पाकिस्तानी सुरक्षेवर विश्वास नाही?CPEC अंतर्गत सुमारे 6,500 चीनी नागरिक सिंध प्रांतातील थार कोळसा ब्लॉकमध्ये दोन ऊर्जा प्रकल्पांवर काम करत आहेत. गुप्तचर अहवालानुसार, चिनी नागरिकांच्या पहिल्या सर्कलमध्ये चिनी सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. चिनी नागरिकांचा बाहेरील लोकांशी कमीत कमी संपर्क यावा यासाठी असे करण्यात आले आहे. सुरक्षा कर्मचारी कामगारांच्या नियोजित हालचाली सुनिश्चित करतील. ही योजना इतर सुरक्षा मंडळांमध्ये तैनात असलेल्या पाकिस्तानी लष्करासोबत शेअर केली जाईल.

चीनने यापूर्वी पाकिस्तानवर आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) ची एक तुकडी तैनात करण्यासाठी दबाव आणला होता. पाकिस्तानने सुरुवातीला ते मान्य केले नाही, परंतु चीनच्या दबावानंतर संयुक्त सुरक्षा कंपन्यांच्या फ्रेमवर्कवर स्वाक्षरी केली. या आराखड्याअंतर्गत चीनचे सुरक्षा दल पाकिस्तानमध्ये तैनात करण्यात आले आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानchinaचीनInternationalआंतरराष्ट्रीय