शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

चिनी लष्कराला युद्धसज्ज राहण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2019 08:33 IST

शी जिनपिंग; अमेरिकेशी तणाव वाढत असल्याचा परिणाम

शांघाय : अमेरिकेसोबतच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या लष्कराला युद्धासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. दक्षिण चिनी समुद्रातील वाढता तणाव, तसेच अमेरिकेसोबत व्यापार आणि तैवानच्या मुद्यावरून निर्माण झालेला संघर्ष यामुळे चीन आपले लष्कर सुसज्ज करू इच्छित आहे. चीनची अधिकृत वृत्तसंस्था शिन्हुआने दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी आपल्या लष्कराला युद्धसज्ज राहण्याचे आदेश दिले. शी जिनपिंग हे चिनी लष्करी आयोगाचे चेअरमनही आहेत.

जिनपिंग यांनी सांगितले की, चिनी लष्कराने नव्या युगातील जबाबदाºया पेलण्यासाठी, तसेच युद्धसज्ज होण्यासाठी आणि युद्ध करण्यासाठी अत्यावश्यक धोरणे आखायला हवीत. गेल्या शंभर वर्षांत पाहिले नाहीत, असे बदल सध्या जगात होत आहेत. चीन अजूनही विकासासाठी धोरणात्मक संधीच्या काळात आहे. आपत्तीच्या काळात तात्काळ प्रतिसाद देता येईल, यासाठी लष्करी दलांनी सक्षम असणे आवश्यक आहे. त्यांनी आपली संयुक्त मोहिमांची क्षमता वाढवायला हवी. नव्या लढाऊ तुकड्या उभारायला हव्यात. (वृत्तसंस्था)तैवानवरून वाद कायमशी जिनपिंग यांनी बुधवारीच तैवानच्या मुद्यावरून आक्रमक भूमिका घेतली होती. तैवानसोबत एकत्रीकरणासाठी, तसेच या बेटाचे स्वतंत्र अस्तित्व रोखण्यासाठी लष्करी बळाचा वापर करण्याचा हक्क चीनने राखून ठेवला आहे, असे वक्तव्य त्यांनी केले होते. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच ‘एशिया रिअ‍ॅश्युरन्स इनिशिएटिव्ह अ‍ॅक्ट’वर स्वाक्षरी करून तैवानच्या सुरक्षेबाबत अमेरिका वचनबद्ध असल्याचे संकेत दिले आहेत. त्यानंतर काही दिवसांतच जिनपिंग यांनी तैवानबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे.

टॅग्स :chinaचीनAmericaअमेरिका