शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

चिनी मीडियानं मोदींवर उधळली स्तुतिसुमनं, आर्थिक सुधारणांची केली तारीफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 15:56 IST

चीनचं सरकारी वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्समधून मोदींवर स्तुतिसुमनं उधळण्यात आली आहेत.

बीजिंग- चीनचं सरकारी वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्समधून मोदींवर स्तुतिसुमनं उधळण्यात आली आहेत. भारतापेक्षा आम्ही खूप पुढे निघून गेलो आहोत. दोन्ही देशांतील आर्थिक वृद्धीचं अंतर फार वाढलं आहेत. चीनची अर्थव्यवस्था 13.6 ट्रिलियनची झाली आहे, तर भारत आतापर्यंत फक्त 2.8 ट्रिलियनच्या जवळपास आहे. त्यामुळे भारतालाही वृद्धीदर वाढवावा लागणार आहे, असंही मतही चीनच्या वृत्तपत्रातून व्यक्त करण्यात आलं आहे. मोदींनी केलेल्या आर्थिक सुधारणा आणि काही सेक्टर्समध्ये होत असलेली प्रगती ही वाखाणण्याजोगी असल्याचं चीननं म्हटलं आहे.खरं तर भारताचा जीडीपी गेल्या पाच वर्षांत 6.7 टक्क्यांच्या वर पोहोचला आहे. परंतु सांख्यिकी कारणास्तव आकड्यांवर परिणाम होतोय. सरकारनं जीडीपी मोजण्याचं तंत्र आणि आधार वर्ष बदलल्यानंही वृद्धीदरावर प्रभाव पडला आहे. गेल्या काही वर्षांत भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फायदा झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही तेलाच्या किमती पडल्या आहेत. भारत दरवर्षी यावर बऱ्यापैकी पैसे खर्च करतो. आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या चढ-उतारही भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करतो. भारतीय अर्थव्यवस्थेला ग्लोबल ऊर्जेच्या किमतीतही फायदा पोहोचला आहे.मोदींनी आर्थिक सुधारणांमध्ये केलेल्या प्रगतीवर ग्लोबल टाइम्सच्या लेखातून स्तुतिसुमनं उधळण्यात आली आहेत. नोटाबंदी, कर सुधारणासारख्या गोष्टी अचानक करण्यात आल्यानं सामान्यांना थोडासा धक्का बसला होता. त्याचा नकारात्मक परिणामही जाणवला, पण ते स्वाभाविक असल्याचंही ग्लोबल टाइम्समध्ये म्हटलं आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी