शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

तिबेटच्या सीमेवर चीनच्या लांब पल्ल्याच्या तोफा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2019 05:26 IST

संरक्षण सज्जतेत वाढ; भारताने सतर्क राहण्याची गरज; ५0 कि.मी. पर्यंत मारा करण्याची क्षमता

बीजिंग : भारताला लागून असलेल्या तिबेटच्या सीमेवर चिनी लष्कराने हलक्या वजनाचे रणगाडे तैनात केले होते. त्यानंतर आता या सीमेवर चीनने लष्करी वाहनांवर बसविलेल्या व एका जागेहून दुसरीकडे सहज वाहून नेता येणाऱ्या लांब पल्ल्याच्या तोफा सज्ज ठेवल्या आहेत. त्यांच्या संरक्षण सज्जतेत वाढ होत असून, त्यामुळे भारताने अधिक सतर्क राहाण्याची गरज आहे.

पर्वतीय भागात अधिक उंचीवर चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीची (पीएलए) संरक्षण क्षमता वाढावी यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भात ग्लोबल टाइम्स या सरकारी वृत्तपत्राने एक बातमी प्रसिद्ध केली आहे. तिबेटच्या सीमेवर पीएलसी-१८१ या लष्करी वाहनांवर लांब पल्ल्याच्या तोफा बसविण्यात आल्या आहेत. २०१७ मध्ये डोकलाममध्ये वाद होऊन भारत व चीनचे सैनिक समोरासमोर उभे ठाकले होते व कोणीही माघारी जाण्याच्या मन:स्थितीत नव्हते, त्यावेळी या तोफांचा वापर चीनने आर्टिलरी ब्रिगेडमध्ये केला होता.साँग झोंगपिंग या संरक्षण अभ्यासकाने सांगितले की, चीनने तैनात केलेल्या लांब पल्ल्याच्या तोफांमधून सुमारे ५० कि.मी. अंतरापर्यंत मारा करता येतो. त्यासाठी लेझर तंत्रज्ञान व उपग्रहांचीही मदत घेता येते.डोकलाम येथे वादंग सुरू असताना चीनने हलक्या वजनाचे रणगाडे व लांब पल्ल्याच्या तोफांच्या आपल्या हद्दीत चाचण्या घेतल्या होत्या. टाईप १५ जातीच्या हलक्या वजनाच्या रणगाड्यांचे इंजिन १००० अश्वशक्तीचे असते. डोंगराळ भागातील लढाईसाठी हे रणगाडे अतिशय उपयुक्त आहेत. (वृत्तसंस्था)युद्धाच्या तयारीत राहण्याचे निर्देशच्चीनच्या लष्कराने सदैव युद्धाच्या तयारीत राहिले पाहिजे, असे त्या देशाचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी गेल्या आठवड्यातच म्हटले होते.च्स्वतंत्र तिबेटच्या मागणीसाठी उठणारे आवाज पूर्णपणे दडपून टाकणे चीनला शक्य झालेले नाही. भारत व इतर देशांसोबत चीनशी असलेल्या सीमातंट्यांवर नजीकच्या काळात तोडगा निघेल, असे दिसत नाही.

टॅग्स :chinaचीन