शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

S. Jaishankar In America : अमेरिकेला परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी सुनावलं; चिनी सरकारी वृत्तपत्रानंही केलं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 22:55 IST

S. Jaishankar In America : चीनचं सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सनं (Global Times) अमेरिकेवर निशाणा साधलाय. भारत त्यांचं ऐकेल हे स्वप्न पाहणं सोडून द्या असं ग्लोबल टाईम्सनं म्हटलंय.

S. Jaishankar In America : युक्रेन आणि रशियादरम्यान सुरू असलेल्या युद्धामध्ये अमेरिका आणि भारत यांच्यातही काही गोष्टींवरून मतभेद दिसून आले. परंतु दुसरीकडे चीनचं सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सनं (Global Times) गेल्या काही दिवसांत भारताच्या निष्पक्ष भूमिकेचं स्वागत केलं, तर अमेरिकेवरही टीका केली आहे. आता पुन्हा एकदा ग्लोबल टाईम्सनं भारताची बाजू घेत उदयास येणाऱ्या महासत्तांशी कसं वागलं पाहिजे हे आता अमेरिकेनं शिकलं पाहिजे असं म्हटलं.

ग्लोबल टाइम्सची ही टिप्पणी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या विधानाच्या संदर्भात आहे, ज्यात त्यांनी मानवाधिकाराच्या मुद्द्यावर अमेरिकेला चोख प्रत्युत्तर दिलं होतं. "स्वतंत्र भारताला मानवाधिकारावर भाषण देण्याचा अमेरिकेला कोणताही अधिकार नाही. भारताला ग्राहक म्हणून पाहण्याचं स्वप्न अमेरिकेनं बंद करण्याची ही योग्य वेळ आहे. अमेरिकेनं आपली नैतिकता आपल्याकडेच ठेवावी आणि उदयास येणाऱ्या महासत्तांशी नीट वागणं शिकलं पाहिजे," असं ग्लोबल टाईम्सनं ट्वीट करत म्हटलं.

अमेरिका भारत टू प्लस टू चर्चेनंतर दोन्ही देशांच्या पार पडलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत एस जयशंकर आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंक न यांनी भारतातील मानवाधिकारांवर वक्तव्य केलं होतं. त्यांच्या वक्तव्यावर जयशंकर यांनी त्वरित उत्तर दिलं नाही. "भारत देखील अमेरिकेतील मानवाधिकारांच्या उल्लंघनाच्या प्रकरणांवर नजर ठेवून आहे," असं त्यांनी सांगितलं. तसंच बैठकीदरम्यान मानवाधिकारावर कोणतीही चर्चा झाली नाही, जर पुढे असं झालं तर भारत यावर चर्चा करण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचंही ते म्हणाले.

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरchinaचीनXi Jinpingशी जिनपिंग