शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

गिलगिट-बाल्टिस्तानच्या वादाबाबत चीनचे मौन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 05:20 IST

गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये स्थानिक प्रशासनाचे अधिकार कमी करण्याच्या पाकिस्तानच्या निर्णयाबद्दल चीनने मौन बाळगणे पसंत केले आहे

बिजिंग : गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये स्थानिक प्रशासनाचे अधिकार कमी करण्याच्या पाकिस्तानच्या निर्णयाबद्दल चीनने मौन बाळगणे पसंत केले आहे. चीन-पाकिस्तानच्या आर्थिक पट्ट्यात (चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर-सीपीइसी) गिलगिट-बाल्टिस्तान हा भाग येत असला तरी त्यामुळे काश्मीरच्या प्रश्नाबाबतच्या आमच्या भूमिकेत काहीही बदल होणार नाही असे चीनने म्हटले आहे. काश्मीर प्रश्नावर भारत-पाकिस्तानने चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढावा अशी चीनची भूमिका आहे.गिलगिट-बाल्टिस्तान संदर्भातील निर्णयाला पाकिस्तानच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने २१ मे रोजी मंजुरी दिली. पाकिस्तानमध्ये पंजाब, खैैबर-पख्तुनख्वा, सिंध, बलुचिस्तान असे चार प्रांत व गिलगिट-बाल्टिस्तान, पाकव्याप्त काश्मीरसह चार केंद्रशासित प्रदेश आहेत.गिलगिट-बाल्टिस्तानचा केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा बदलून त्याला देशातील पाचवा प्रांत म्हणून मान्यता देण्याच्या हालचाली पाकिस्तान सरकारने सुरु केल्या आहेत. त्याला तेथील विरोधी पक्षांनी जोरदार विरोध केला आहे. तसेच या निर्णयाचा भारतानेही तीव्र निषेध केला आहे. गिलगिट-बाल्टिस्तानसह संपूर्ण काश्मीर आमचा अविभाज्य भाग असल्याचेही भारताने पाकिस्तानला यानिमित्ताने पुन्हा ठासून सांगितले आहे. (वृत्तसंस्था)चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग यांनी पत्रकारांना सांगितले की, सीपीइसीची निर्मिती ही चीन व पाकिस्तानच्या आर्थिक सहकार्यातून होत आहे. त्यातून या पट्ट्याचा विकास होणार असून लोकांचे जीवनमानही सुधारणार आहे.पाकच्या ताब्यात असलेल्या काश्मीरच्या भागाचे गिलगिट-बाल्टिस्तान, पाकव्याप्त काश्मीर असे दोन विभाग करण्यात आले आहेत. गिलगिट-बाल्टिस्तानला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा पाकने दिला असला तरी या भूभागाबद्दल अनेक वाद आहेत. त्यामुळे आता त्याला प्रांताचा दर्जा द्यावा अशी सूचना चीनने पाकिस्तानला केली असण्याची शक्यता आहे.