शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:च्याच रणनीतीमध्ये अडकला चीन; सरकारच्या नव्या आकडेवारीनं चिंता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 15:44 IST

वन चाईल्ड धोरणामुळे चीनच्या जन्मदरात वेगाने घट झाली. आता जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणारे देश लोकसंख्येतील घट यामुळे चिंतेत आहे.

सातत्याने लोकसंख्येत होणारी घट पाहता चीनची चिंता वाढली आहे. बुधवारी चीनच्या सरकारने वार्षिक आकडेवारी जारी केली. त्यानुसार चीनमध्ये २०२३ मध्ये तब्बल २० लाख लोकसंख्या घटली आहे. मागील ६ दशकात पहिल्यांदा २०२२ मध्ये चीनच्या लोकसंख्येत घट झाली होती. त्याचे कारण म्हणजे चीनच्या जन्मदरात मोठी घट झाली होती. काही वर्षापूर्वी चीने वाढती लोकसंख्या पाहता देशात वन चाईल्ड पॉलिसी लागू करण्याचा निर्णय घेतला होता. 

वन चाईल्ड धोरणामुळे चीनच्या जन्मदरात वेगाने घट झाली. आता जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणारे देश लोकसंख्येतील घट यामुळे चिंतेत आहे. आगामी काही वर्षात चीनमधील ही समस्या आणखी बिकट होणार आहे. संयुक्त राष्ट्र लोकसंख्येच्या रिपोर्टनुसार, भारताने आता चीनला मागे टाक लोकसंख्येच्या बाबतीत जगात सर्वात मोठा देश बनला आहे. भारताची लोकसंख्या मागील वर्ष १४२.८६ कोटी नोंदवली आहे. चीनची लोकसंख्या १४० कोटी होती. चीनच्या नॅशनल ब्यूरो ऑफ स्टॅटिक्सच्या आकडेवारीत चीनमध्ये मागील वर्षी ९० लाख मुले जन्माला आली जी २०२२ च्या तुलनेत जन्मलेल्या ९५.६ लाख मुलांच्या ५ टक्क्याने कमी आहे. 

आव्हानाला तोंड देण्यासाठी चीन सरकारची नवी योजना

घटत्या लोकसंख्येमुळे चीन आता गंभीर विचार करत आहे. त्यामुळे मे २०२१ मध्ये चीन सरकारने लोकसंख्या वाढीसाठी ३ मुलांची पॉलिसी लागू केली. चीन सरकारने त्यांच्या अनेक प्रांतात जन्म दर वाढवण्यासाठी दुसऱ्या आणि तिसऱ्या अपत्यांना जन्म देण्यासाठी प्रोत्साहन योजना आणल्या. जेणेकरून जोडपे मुलांना जन्म देऊ शकतील. परंतु आता आलेल्या आकडेवारीत या योजनांचा चीनमध्ये जास्त परिणाम न झाल्याचे दिसून येते. चीनमध्ये २०१६ पासून लोकसंख्या विकास दर कमी झाला आहे कारण मुलांच्या पालन पोषण, शिक्षणाचा खर्च वाढला आहे. या जीवनशैलीमुळे युवा जोडपे मूल जन्माला घालण्यापासून  दूर आहेत अथवा लग्नही केली जात नाहीत. 

टॅग्स :chinaचीन