शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: चीनमधून मोठी बातमी; कोरोनाचा कहर आटोक्यात, नवीन रुग्णांची संख्या 'एकेरी', कार्यालयं उघडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2020 15:20 IST

कोरोनाचा केंद्रबिंदू असलेल्या भागातील परिस्थिती सुधारली

ठळक मुद्देहुबेई प्रांतातल्या परिस्थितीत सुधारणा; कोरोनाच्या रुग्णांची संख्या घटलीप्रशासनाकडून निर्बंध शिथिल; जनजीवन हळूहळू पूर्वपदावरकोरोनाचा केंद्रबिंदू असलेल्या परिसरातील परिस्थिती सुधारली

बीजिंग: जगभरात सध्या कोरोनाची दहशत पाहायला मिळतेय. चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोनामुळे आतापर्यंत ४ हजारहून अधिक जणांचा मृत्यू झालाय. एकट्या चीनमध्ये कोरोनाची बाधा झाल्यानं मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ३ हजाराहून अधिक आहे. मात्र आता चीनमधील कोरोनाचा कहर आटोक्यात येताना दिसतोय. त्यामुळे बऱ्याचशा भागांमधले निर्बंध उठवले जात असून जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागलंय. हुबेई प्रांतात लागू असलेले प्रवासावरील निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात येत आहेत. याशिवाय हुबेई प्रांतातल्या दोन शहरांमधील कार्यालयंदेखील सुरू होऊ लागली आहेत. हुबेईची अर्थव्यवस्था उत्पादन आणि ऑटो क्षेत्रावर अवलंबून आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या हुबेईतली परिस्थिती हळूहळू सुधारतेय. कोरोनाचा केंद्रबिंदू असलेल्या हुबेईमध्ये पहिल्यांदाच एका दिवसात दहापेक्षा कमी रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे प्रशासनानं परिसरात लागू असलेले निर्बंध काही प्रमाणात शिथिल केले आहेत. जगातल्या अनेक देशांमध्ये कोरोना वेगानं पसरत असला, तरी चीनमध्ये तो नियंत्रणात आला आहे. गेल्या सात दिवसांत चीनमधील परिस्थिती सुधारली आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासनानं महत्त्वाची पावलं उचलण्यात आली होती. त्याचा परिणाम आता दिसू लागलाय. वुहानची लोकसंख्या १ कोटी १० लाख इतकी आहे. वुहानमधूनच कोरोना विषाणू जगभरात पसरला. वुहानमध्ये काल सापडलेल्या कोरोना रुग्णांची नोंद राष्ट्रीय आरोग्य आयोगानं केली. हुबेई प्रांताच्या बाहेर असलेल्या मेनलँड चायनामध्ये कोरोनाचे सात नवे रुग्ण आढळून आले. त्यातले ६ जण परदेशातून आले आहेत. या सहा जणांपैकी तिघे गुआंगडाँग, दोन जण गान्सू, तर एक जण हेनान प्रांतातला आहे. बुधवारी मेनलँड चायनामध्ये कोरोनाचे १५ रुग्ण सापडले. मंगळवारी हाच आकडा २४ इतका होता.  

टॅग्स :corona virusकोरोनाchinaचीन