शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

पाकच्या ९० वधूंचा चीनने रोखला व्हिसा; मानवी तस्करीचा संशय, विवाहांचे दाखवले जाते आमिष

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 06:16 IST

बनावट विवाहांच्या माध्यमातून पाकिस्तानी मुलींची चीनमध्ये तस्करी केली जाते, असा वाद निर्माण झालेला असताना चीनच्या येथील दूतावासाने ९० पाकिस्तानी वधूंचा व्हिसा रोखून धरला आहे.

इस्लामाबाद : बनावट विवाहांच्या माध्यमातून पाकिस्तानी मुलींची चीनमध्ये तस्करी केली जाते, असा वाद निर्माण झालेला असताना चीनच्या येथील दूतावासाने ९० पाकिस्तानी वधूंचा व्हिसा रोखून धरला आहे.चीनच्या येथील दूतावासाचे उपप्रमुख लिजियान झाओ मंगळवारी म्हणाले की, यावर्षी चीनच्या नागरिकांकडून पाकिस्तानी वधूंसाठी व्हिसा मागणारे १४० अर्ज आम्हाला मिळाले. त्यातील ५० व्हिसा मंजूर करण्यात आले असून, उर्वरित रोखून धरण्यात आले. २०१८ वर्षात असे व्हिसा मागणारे १४२ अर्ज आले होते.कंत्राटी विवाहाचे आमिष दाखवून पाकिस्तानी मुलींची चीनमध्ये तस्करी करण्यात गुंतलेल्या टोळ्यांवर कारवार्ई करण्यास पाकिस्तान सरकारने नुकतेच फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीला सांगितले आहे.गरीब ख्रिश्चन्स मुलींना पाकिस्तानात काम करीत असलेल्या किंवा पाकिस्तानला भेट देणाऱ्या चिनी पुरुषांशी लग्न केल्यास पैसा आणि चांगल्या आयुष्याचे आमिष बेकायदा विवाह जुळविणारी केंद्रे दाखवतात. या केंद्रांकडून हे चिनी लोक बनावट कागदपत्रांद्वारे एक तर ख्रिश्चन्स किंवा मुस्लिम असल्याचे दाखविले जाते. बहुतेक मुली या मानवी तस्करीच्या बळी ठरून त्यांना सक्तीने वेश्या व्यवसाय करावा लागला आहे.दोन देशांतील वधू-वरांत विवाह होण्याच्या प्रमाणात अचानक वाढ झाल्यामुळे अधिकारी सावध झाले आणि आम्ही संबंधित पाकिस्तानी अधिकाऱ्यांना हा विषय सांगितला. (वृत्तसंस्था)

माध्यमांकडून वस्तुस्थितीचा विपर्यासझाओ म्हणाले की, प्रसारमाध्यमांनी वस्तुस्थितीचा विपर्यास केला. मुलींना वेश्या व्यवसायात ढकलले जाते किंवा त्यांचे अवयव काढून घेतले जातात, याचा कोणताही पुरावा नाही. सगळे विवाह हे बनावट असल्याचा इन्कार करून झाओ म्हणाले की, गेल्या वर्षी ज्या चिनी नागरिकांनी त्यांच्या पाकिस्तानी पती किंवा पत्नीच्या व्हिसासाठी अर्ज केला होता त्या सगळ्यांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व कायदेशीर गोष्टींची पूर्तता केली होती.

टॅग्स :Pakistanपाकिस्तान