चीनच्या सैन्याने आपल्या भात्यात आता लांडग्याच्या रुपातील रोबो आणला आहे. मंगळवारीच चिनी सैन्याने या रोबोसोबत युद्धसराव केला आहे. एका मिनिटाला हा लांडगा रोबो ६० गोळ्या झाडताना दिसून आला आहे. म्हणजेच एका सेकंदाला एक गोळी हा लांगडा झाडत होता.
चिनी सैन्याने (पीएलए) आपल्या पथकात एका रोबोटिक लांडग्याचा समावेश केला आहे. ग्लोबल टाईम्सने याचा व्हिडिओ प्रकाशित केला आहे. एकीकडे आजची युद्धे हायटेक होत चालली आहेत. अशातच चीनने सैन्यासोबत लांडग्याच्या रुपातील रोबो आणल्याने आता ही युद्धे कोणत्या पातळीवर जाऊन लढली जातील याची कल्पनाही धडकी भरवणारी आहे.
चीनच्या या लांडग्याबाबत आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे हा लांडला बर्फावरून, उंच डोंगरावरून आरामात चालत जाऊ शकतो. म्हणजेच हा लांडगा जिथे सैनिक सहज पोहोचू शकणार नाहीत तिथे जाऊन शत्रूला मिनिटाला ६० गोळ्या झाडून संपवू शकणार आहे. अशा प्रकारची शस्त्रांचा सामना कसा करायचा याची शत्रूला माहितीही नसणार आहे.
{{{{facebook_video_id####https://www.facebook.com/reel/2766412463749928/}}}}
या लांडग्यामध्ये लांडग्याच्या आत QBZ-191 असॉल्ट रायफल बसवण्यात आली आहे. रोबोटिक लांडग्याचे वजन सुमारे ७० किलो आहे. दुर्गम भागात लढण्यासाठी चिनी सैनिक कमकुवत आहेत. यामुळे चीनने या लांडग्याची निर्मिती केली आहे. चीनचे सध्या जपान, फिलीपिन्स, तैवान, भारत यासारख्या देशांशी वैर आहे. यामुळे चीन आपले सैन्य हायटेक करण्यात गुंतलेला आहे.