शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : जम्मूमध्ये अलर्ट, जोधपूरमध्ये शाळा बंद! सीमेवर लष्कर सतर्क; हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय केल्या
2
"हम अल्लाह की कसम खाते है...."; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अल कायदाची भारताला धमकी
3
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
4
भारत, पाकिस्तानात जाऊ नका; अमेरिका, चीनसह बड्या देशांनी दिल्या नागरिकांना सूचना
5
Asim Munir Net Worth: रियल इस्टेट, बँक, डेअरी... कंगाल पाकिस्तानचे सेना प्रमुख १०० कंपन्यांचे CEO; किती आहे संपत्ती?
6
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
7
मनसेशी युती केली तर उद्धवसेनेला बळ? ठाकरेंना शह देणे महायुतीला जाईल जड; राजकीय गणिते बदलणार
8
कोहलीने दिला हात, अनुष्का थेट दुर्लक्ष करुन पुढे गेली; 'विरुष्का'चा बंगळुरुमधील Video व्हायरल
9
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹८९,९८९ चं फिक्स व्याज; मिळेल सरकारची गॅरेंटी
10
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
11
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
12
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
13
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
14
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
16
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
17
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
18
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 

बायडेन यांनी शपथ घेताच चीनने ट्रम्प टीमविरोधात उचलले मोठे पाऊल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2021 09:06 IST

china ban on Donald Trump Team: पॉम्पिओ यांनी शेवटच्या दिवशी वीगर मुस्लिमांवरून चीनवर कठोर टीका केली होती. चीनने वीगर मुस्लिमांचा नरसंहार केला आहे. माझ्या माहितीनुसार चीनकडून हा नरसंहार आजही सुरुच आहे. चीनची कम्युनिस्ट पार्टी या मुस्लिमांना सुनियोजित पद्धतीने संपवत आहे, असे ते म्हणाले होते. महत्वाचे म्हणजे बायडन यांच्या सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री होणारे अँटोनी ब्लिंकन यांनीदेखील पॉम्पिओंच्या वक्तव्याला समर्थन दिले आहे. 

अमेरिकेमध्ये जो बायडेन यांनी शपथ घेतली. बायडेन यांनी शपथ घेताच चीनने माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात मोठे पाऊल उचलले आहे. ट्रम्प यांच्या टीमवर प्रतिबंध लादले आहेत. 

डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीममध्ये माजी परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ, माजी एनएसए रॉबर्ट ओब्रायन यांच्यासह ट्रम्प यांच्या सर्व मंत्र्यांवर बंदीची घोषणा केली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी याची घोषणा केली आहे. गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेच्या काही चीन विरोधी स्वार्थी राजकारण्यांनी आपले राजकीय हीत जोपासण्यासाठी चीन विरोधी भूमिका घेतली होती. यामुळे अमेरिकी आणि चीनच्या लोकांचे हित दुर्लक्षित करण्यात आले. अमेरिकेच्या या नेत्यांनी जाणूनबुजून अशी पाऊले उचलली ज्याने चीनच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये हस्तक्षेप होत होता. या पावलांमुळे चीनचे लोक अपमानीत झाले आणि दोन्ही देशांच्या संबंधांना नुकसान पोहोचले. चीन सरकार पूर्णपणे देशाची संप्रभुता, सुरक्षा आणि हितांचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. 

चीनने अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री पॉम्पिओ, रॉबर्ट ब्रायन आणि जॉन बॉल्टन यांच्यासह ट्रम्प सरकारमध्ये असलेल्या 8 लोकांवर प्रतिबंध लावले आहेत.  यानुसार हे नेते, त्यांचे कुटुंबीय चीन, हाँगकाँग आणि मकाऊला जाऊ शकत नाहीत. तसेच हे नेते, त्यांच्याशी जोडलेल्या संघटना आणि कंपन्या यापुढे चीनसोबत कोणत्याही प्रकारचा व्यवसाय करू शकणार नाहीत, असेही यामध्ये म्हटले आहे. 

पॉम्पिओ यांनी शेवटच्या दिवशी वीगर मुस्लिमांवरून चीनवर कठोर टीका केली होती. चीनने वीगर मुस्लिमांचा नरसंहार केला आहे. माझ्या माहितीनुसार चीनकडून हा नरसंहार आजही सुरुच आहे. चीनची कम्युनिस्ट पार्टी या मुस्लिमांना सुनियोजित पद्धतीने संपवत आहे, असे ते म्हणाले होते. महत्वाचे म्हणजे बायडन यांच्या सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री होणारे अँटोनी ब्लिंकन यांनीदेखील पॉम्पिओंच्या वक्तव्याला समर्थन दिले आहे. 

बायडेन नवे राष्ट्राध्यक्षव्हाइट हाउसच्या प्रांगणात नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिकेच्या ४६व्या अध्यक्षपदाची तर कमला हॅरिस यांनी उपाध्यक्षपदाची शपथ घेतली. या वेळी असंख्य मान्यवर उपस्थित होते. मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र या सोहळ्याला पाठ दाखवली. मात्र, मावळते उपाध्यक्ष माइक पेन्स या सोहळ्याला आवर्जून उपस्थित होते. दुपारी १२च्या ठोक्याला अमेरिकेचे सरन्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांनी बायडेन यांना पदाची शपथ दिली. या वेळी बायडेन यांनी १२७ वर्षांची परंपरा असलेल्या आपल्या कौटुंबिक बायबलची प्रत हातात घेतली होती. २५ हजार सुरक्षारक्षकांच्या गराड्यात शपथविधी सोहळा झाला. कॅपिटॉल हिलवर अलीकडे झालेल्या हल्ल्याची काळी किनार सोहळ्याला होती. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पchinaचीनJoe Bidenज्यो बायडन