शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

लष्करी सामर्थ्य वाढविण्यास चीन करतो तंत्रज्ञानाची चोरी, पॉलिसी रिसर्च ग्रुपचा निष्कर्ष; या देशांत सर्वाधिक हेरगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2022 13:55 IST

पॉलिसी रिसर्च ग्रुपने म्हटले आहे की, अमेरिकेची गुपिते जाणून घेण्यासाठी चीनचा सर्वाधिक आटापिटा चाललेला असतो. त्यासाठी अतिशय अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो.

बीजिंग : आपले लष्करी सामर्थ्य वाढविण्यासाठी चीन वाट्टेल त्या मार्गाचा अवलंब करत आहे. सायबरमार्गे तंत्रज्ञानाची चोरी करून किंवा गोपनीय माहितीसाठी चिनी नागरिकांना दुसऱ्या देशांत विशेषत: अमेरिका व युरोपात हेरगिरीस भाग पाडून शक्तिशाली बनण्याच्या प्रयत्नात असल्याचा दावा पॉलिसी रिसर्च ग्रुपने केला आहे. या अहवालात म्हटले आहे की, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी कोणत्याही मार्गाने आपल्या देशाला प्रबळ करण्याचे ठरविले आहे. अमेरिका, युरोपातील काही देश वगळता चीन रशियापासून इतर देशांच्या लष्करी तंत्रज्ञानाची सायबर वा अन्य मार्गाने सर्रास चोरी करतो. गरीब देशांमधील विकास प्रकल्पांत चीनने मोठी गुंतवणूक केली आहे. जे देश चीनची कर्जे फेडू शकत नाहीत, त्यांची अवस्था केविलवाणी होते. त्यांना चीनच्या मागण्यांपुढे मान तुकवावी लागते. (वृत्तसंस्था)

अमेरिका चीनपेक्षाही सरसपॉलिसी रिसर्च ग्रुपने म्हटले आहे की, अमेरिकेची गुपिते जाणून घेण्यासाठी चीनचा सर्वाधिक आटापिटा चाललेला असतो. त्यासाठी अतिशय अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो. मात्र, अमेरिकेकडे चीनपेक्षाही प्रगत तंत्रज्ञान असल्यामुळे चीनचे चोरीचे अनेक प्रयत्न हाणून पाडण्यात येतात. अमेरिकेच्या पेंटॅगॉनच्या अहवालातही चीन करत असलेल्या चोऱ्या व हेरगिरीबाबत विस्तृत माहिती देण्यात आलेली आहे. त्याचा हवाला पॉलिसी रिसर्च ग्रुपने दिला आहे.

हेरगिरी करणाऱ्या चिनी लोकांची मोठ्या प्रमाणावर धरपकड - अमेरिकेमध्ये चिनी नागरिक मोठ्या संख्येने स्थलांतर करतात. त्यातील अनेकजण शिक्षण, नोकरी, व्यवसायासाठी अमेरिकेत जातात, पण त्यातील काही चीनसाठी अमेरिकेत हेरगिरी करतात. - अशा चार चिनी नागरिकांना अमेरिकी तपास यंत्रणांनी २४ ऑक्टोबर रोजी अटक केली होती. त्यातले तीनजण चीनच्या सुरक्षा विभागातील अधिकारी असल्याचे तपासात आढळून आले. - २०२१मध्ये अमेरिकेने हेरगिरीच्या आरोपावरून सहा चिनी अध्यापकांना अटक केली. २०२० साली अमेरिकेमध्ये शिकणाऱ्या काही चिनी विद्यार्थ्यांना हेरगिरी करताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. त्यातील एकजण चिनी लष्करातील अधिकारी होता व तो विद्यार्थी बनून अमेरिकेत आला होता. विमान बनविण्यासाठी केली कॉपीचीनचे जे-२० हे विमान अमेरिकेच्या एफ-२२ व जे-३१ विमान एफ-३५ विमानासारखेच असल्याचा आरोप झाला होता. चीनने हे दावे फेटाळून लावले आहेत. मात्र, विमान निर्मितीसाठी चीनने अमेरिकी तंत्रज्ञानाची कॉपी केली आहे हे काही जगापासून लपून राहिलेले नाही, असेही पॉलिसी रिसर्च ग्रुपने म्हटले आहे. 

टॅग्स :chinaचीनAmericaअमेरिका