शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

CoronaVirus: भारतानं FDIच्या नियमांत केलेल्या बदलानंतर चीन भडकला; म्हणाला... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 14:57 IST

थेट परदेशी गुंतवणुकीच्या नियमात बदल केल्यानं चीननं भारतावर टीका केली आहे.

ठळक मुद्देचीन आणि त्याला लागून असलेल्या सीमा भागातून, तसेच इतर सात देशांमधून येणाऱ्या परकीय गुंतवणुकीसाठी पूर्वपरवानगी घेणं आवश्यक असल्याचं भारताने जाहीर केलं आहे. परकीय गुंतवणूक नियमात बदल करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. थेट परदेशी गुंतवणुकीच्या नियमात बदल केल्यानं चीननं भारतावर टीका केली आहे.चीनच्या गुंतवणूकदारांवरही भारताच्या या धोरणाचा प्रभाव पडत असल्याचं चिनी दूतावासाचे प्रवक्ते जी रोंग म्हणाले आहेत. 

बीजिंगः चीन आणि त्याला लागून असलेल्या सीमा भागातून, तसेच इतर सात देशांमधून येणाऱ्या परकीय गुंतवणुकीसाठी पूर्वपरवानगी घेणं आवश्यक असल्याचं भारताने जाहीर केलं आहे. यासाठी परकीय गुंतवणूक नियमात बदल करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. थेट परदेशी गुंतवणुकीच्या नियमात बदल केल्यानं चीननं भारतावर टीका केली आहे. जागतिक व्यापार संघटनेच्या सिद्धांताच्या हे विरोधात असून,  मुक्त आणि निष्पक्ष व्यापार धोरणाच्या हे विरोधात आहे. भारतानं परदेशी गुंतवणुकीचे नियम बदलून भेदभाव केला आहे. चीनच्या गुंतवणूकदारांवरही भारताच्या या धोरणाचा प्रभाव पडत असल्याचं चिनी दूतावासाचे प्रवक्ते जी रोंग म्हणाले आहेत. भारताकडून चीनमधून येणाऱ्या गुंतवणुकीवर आता नजर ठेवण्यात येणार आहे. तसेच अप्रत्यक्षरित्या चीनमधून येणाऱ्या गुंतवणुकीलाही आता परवानगी लागणार आहे. भारतातील कमकुवत उद्योग वाचवणं हा उद्देश असल्याने भारताना हा महत्वाचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता एखाद्या कोणत्याही देशातील गुंतवणूक भारतात येणार असेल, पण त्या संबंधित कंपनीत जर चीनची गुंतवणूक असेल, तर त्याला देखील आता परवानगी घेण्याची गरज असणार आहे. भारताने चीनच्या अप्रत्यक्ष गुंतवणुकीविरोधातही फास आवळल्याने गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले आहेत. संधिसाधू गुंतवणूक टाळण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय बाजारात रोकड तरलतेचा अभाव असल्याने आर्थिक संकट आहे. याचा फायदा घेऊन चीनने अनेक उद्योगांमध्ये आपले पाय पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

Coronavirus : जगभरात चीन पडला एकाकी; अमेरिकेची भूमिका ठरणार निर्णायक

दरम्यान, कोरोनोत्तर काळात चीनमधून अनेक विशेषत: मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या आपला गाशा गुंडाळतील अशी शक्यता आता जगभर बोलून दाखवली जाते आहे. जपान सरकारने तर घसघशीत रकमेची तरतूद करत आपल्या कंपन्यांना आर्थिक हात दिला आणि चीनमधून बाहेर पडण्यास सांगितलं आहे. जपानमध्ये परत या नाही, तर अन्य आशिया-पॅसिफिक देशांत गुंतवणूक करता येतेय का पाहा, असा सल्लाही जपाननं दिला आहे. आता अमेरिकन कंपन्यांही आपले मॅन्युफॅक्चरिंगचे काम चीनमधून हलवतील आणि तशाच तुलनेनं स्वस्त मनुष्यबळ व कच्चा मालासह अन्य सेवांसाठी भारतात येतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. साधारण २०० कंपन्या भारतात आपले तळ उभारण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. भारतात अधिक पारदर्शक कारभार असून, नवी दिल्लीने आर्थिक सुधारणांना वेग दिला आहे. भारतानं काही बदल स्वीकारले तर या कंपन्या भारतात येतील आणि त्याचा भारताला मोठा फायदा होऊ शकेल.

टॅग्स :chinaचीनcorona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी