शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
4
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
5
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
6
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
7
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
8
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
9
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
10
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
11
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
12
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
13
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
14
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
15
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
16
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
17
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
18
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
19
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
20
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 

चीनला खडसावले, अरुणाचल भारताचेच; परराष्ट्रमंत्र्यांनी चीनचा दावा फेटाळला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2024 08:32 IST

सीमावर्ती राज्य असलेले अरुणाचल प्रदेश ‘भारताचा अविभाज्य भाग’ असल्याचे ते म्हणाले.

सिंगापूर : परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी शनिवारी अरुणाचल प्रदेशवर चीनचा दावा ‘हास्यास्पद’ असल्याचे सांगत  त्यांचा दावा फेटाळून लावला. सीमावर्ती राज्य असलेले अरुणाचल प्रदेश ‘भारताचा अविभाज्य भाग’ असल्याचे ते म्हणाले. येथील नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर (एनयूएस)च्या प्रतिष्ठित इन्स्टिट्यूट ऑफ साउथ एशियन स्टडीज (आएसएस)मध्ये अरुणाचल प्रदेश मुद्द्यावर व्याख्यान दिल्यानंतर एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, ‘हा काही नवीन मुद्दा नाही. म्हणजे चीनने दावा केला आहे, त्याने आपला दावा वाढवला आहे. दावा सुरुवातीस हास्यास्पद होता आणि आजही हास्यास्पद आहे,’ परराष्ट्रमंत्री जयशंकर, जे येथे तीन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत, बोलताना त्यांनी अरुणाचल प्रदेश हा भारताचा नैसर्गिक भाग आहे यावर भर दिला.

नेताजी बोस व आझाद हिंद सेनेला अभिवादन करत सिंगापूर दौऱ्याची सुरुवात परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी शनिवारी सिंगापूर येथील युद्ध स्मारकावर नेताजी सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद सेनेच्या सैनिकांना आदरांजली अर्पण करून त्यांच्या तीन दिवसीय सिंगापूर दौऱ्याची सुरुवात केली. एक्सवर पोस्टमध्ये जयशंकर म्हणाले की, ‘नेताजी आणि आझाद हिंद सेनेच्या शूर सैनिकांना आदरांजली अर्पण करून दौऱ्याची सुरुवात केली. त्यांची प्रखर देशभक्ती येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे.’ 

‘द्विपक्षीय संबंध वाढवण्याची संधी’ जयशंकर भेटीदरम्यान सिंगापूरच्या पंतप्रधान ली सिएन लुंग यांच्यासह प्रमुख नेत्यांची भेट घेतील. सिंगापूरच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले की, ‘जयशंकर यांची भेट सिंगापूर आणि भारत यांच्यातील घनिष्ठ मैत्रीला अधोरेखित करते. दोन्ही बाजूंना प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर विचारविनिमय करण्याची, तसेच द्विपक्षीय सहकार्यातील चांगल्या प्रगतीवर चर्चा सुरू ठेवण्याची या भेटीमुळे एक चांगली संधी आहे.’

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकर