शहरं
Join us  
Trending Stories
1
Priya Marathe Passes Away: लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी
2
"१० वर्षे सत्तेत होता, खोलात जायला लावू नका"; आरक्षणावरुन शरद पवारांच्या सल्ल्यावर अजितदादांचे प्रत्युत्तर
3
रोहित शर्माची झाली फिटनेस टेस्ट; ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे मालिकेत खेळणार की नाही? जाणून घ्या
4
LPG, ITR ते क्रेडिट कार्ड... १ सप्टेंबरपासून ‘या’ ७ गोष्टींचा तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
5
"माझा प्रॉब्लेम आहे, मंगळसूत्र चोरांच्या विरोधात मी लढत नाही"; जयंत पाटलांनी गोपीचंद पडळकरांना डिवचलं
6
कहानी में ट्विस्ट! शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी मेलानिया ट्रम्प यांच्या नावाचे नामांकन?
7
आजचे राशीभविष्य, ३१ ऑगस्ट २०२५ : आजचा दिवस शुभ फलदायी, धन लाभ होईल, मानसिक शांतता लाभेल !
8
Mumbai Police: मुंबई पोलीस, गुन्हे शाखेच्या पोलिसांच्याही सुट्ट्या रद्द!
9
शेकडो टॉयलेट, ११ टँकर, ४५० कर्मचारी; आंदोलकांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेकडून उपाययोजना
10
हलगीचा ताल, झांजेच्या झंकाराने निनादले रस, आंदोलकांचा नाचत जल्लोष 
11
maratha andolan: आझाद मैदानात चिखलात बसून आंदोलन
12
Manoj Jarange: "...तर एकही मराठा घरी दिसणार नाही" जरांगे पाटलांचा इशारा
13
Uddhav Thackeray: सरकारने तुमच्या मागण्यांबाबत...; उद्धव ठाकरेंचा जरांगेंना फोन!
14
येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार
15
केंद्र सरकारच्या GST सुधारणांना विरोधी पक्षांचा पाठिंबा, पण..; जयराम रमेश स्पष्टच बोलले
16
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
17
प्रेमप्रकरणातून आंबा घाटात तरूणीचा खून; मृतदेह दरीत फेकून दिला
18
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले
19
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
20
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू

मोठी बातमी : आता चीनकडून Digital Strike, अमेरिकेसह अनेक मोठ्या देशांच्या 105 अ‍ॅपवर घातली बंदी

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: December 8, 2020 12:53 IST

याच वर्षी भारताने चीनवर तीन वेळा डिजिटल स्ट्राईक केले.  तिसऱ्या डिजिटल स्ट्राइकमध्ये केंद्रातील मोदी सरकारने चीनच्या 43 मोबाईल अ‍ॅप्लिकेशन्सवर पूर्णपणे बंदी घातली.

ठळक मुद्देचीन सरकारने 105 अ‍ॅपवर बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे. अमेरिकेसह जगातील अनेक मोठ्या देशांतील प्रसिद्ध अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. या अ‍ॅप्सवर अश्लील साहित्य, वेश्यावृत्ती, जुगार आणि हिंसक गोष्टी पसरविण्याचा आरोप आहे.

बिजिंग -भारतानंतर आता चीननेही डिजिटल स्ट्राइक केले आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, चीन सरकारने 105 अ‍ॅपवर बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे. यात अमेरिकेसह जगातील अनेक मोठ्या देशांतील प्रसिद्ध अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. एवढेच नाही, तर हे अ‍ॅप तत्काळ अ‍ॅप स्टोअरवरूनही हटविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

याच वर्षी भारताने चीनवर तीन वेळा डिजिटल स्ट्राईक केले.  तिसऱ्या डिजिटल स्ट्राइकमध्ये केंद्रातील मोदी सरकारने चीनच्या 43 मोबाईल अ‍ॅप्लिकेशन्सवर पूर्णपणे बंदी घातली. भारताने आतापर्यंत चीनच्या जवळपास 220 मोबाईल अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. यात टिकटॉक, पबजी आणि यूसी ब्राउझर सारख्या प्रसिद्ध अ‍ॅप्सचा समावेश आहे.

...म्हणून चीनने या अ‍ॅप्सवर घातली बंदी -चीनने अमेरिकेची ट्रॅव्हल कंपनी ट्रिपअ‍ॅडव्हायझरसह 105 अ‍ॅप्स देशाच्या अ‍ॅप स्टोर्सवरून हटवले आहेत. रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, एका अभियानांतर्गत ही बंदी घालण्यात आली आहे. या अ‍ॅप्सवर अश्लील साहित्य, वेश्यावृत्ती, जुगार आणि हिंसक गोष्टी पसरविण्याचा आरोप आहे. चीनच्या सायबरस्पेस प्रशासनाने मंगळवारी आपल्या वेबसाईटवर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की या अ‍ॅप्सनी कसल्याही प्रकारची माहिती न देता एकापेक्षा अधिक वेळा सायबर कायद्याचे उलंघन केले आहे.

भारताने अनेक अ‍ॅप्सवर घातलीय बंदी -भारत सरकारने जून 2020मध्ये टिकटॉकसह 59 मोबाईल अ‍ॅप्लिकेशन्सवर बंदी घातली होती. याशिवाय 2 सप्टेंबरला 110 इतर अ‍ॅप्लिकेशन्सवर बंदी घातली होती. यातील अधिकांश चिनी अ‍ॅप्स होते. यांपैकी अनेक अ‍ॅप्सवर भारतीय नागरिकांची अधिकांश माहिती जमवण्याचा (विशेषतः सीमावर्ती भागांतील नागरिकांची प्रोफायलिंग करून माहिती जमवणे) आरोप ठेवण्यात आला होता.

टॅग्स :chinaचीनXi Jinpingशी जिनपिंगAmericaअमेरिकाIndiaभारतMobileमोबाइल