शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

मुलांच्या चुकीची शिक्षा पालकांना मिळणार! चीनमध्ये आणला जातोय नवा कायदा, नेमकं प्रकरण काय? वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 14:52 IST

चीनमध्ये (China) आता लहान मुलांच्या चुकीची शिक्षा त्यांच्या पालकांना भोगावी लागणार आहे. यासाठी चीनी संसदेत (China Parliament) तसा कायदाच संमत करण्याची तयारी केली जात आहे.

चीनमध्ये (China) आता लहान मुलांच्या चुकीची शिक्षा त्यांच्या पालकांना भोगावी लागणार आहे. यासाठी चीनी संसदेत (China Parliament) तसा कायदाच संमत करण्याची तयारी केली जात आहे. या नव्या कायद्यांतर्गत मुलांनी केलेल्या चुकीची शिक्षा पालकांना म्हणजेत मुलांच्या आई-वडिलांनी भोगावी लागणार आहे. 'फॅमिली एज्युकेशन प्रोमोशन लॉ'चा (Family education promotion law) मसुदा तयार केला जात असून यात आई-वडिलांच्या संस्कारात वाढत असलेल्या मुलांकडून कोणत्याही प्रकारचा अपराध घडला तर त्याची जबाबदारी पालकांची असणार आहे. यासाठी कौटुंबिक शिक्षा मार्गदर्शन कार्यक्रमांमध्ये पालकांना सहभागी व्हावं लागणार आहे. 

नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या (NPC) कायदे मंडळाचे प्रवक्ते जांग तिवैक यांच्या म्हणण्यानुसार, "लहान मुलांच्या चुकीच्या वागणुकीमागे अनेक कारणं असतात. यात कौटुंबिक संस्कारांचा अभाव हेही एक महत्त्वाचं कारण ठरतं. पाल्यांनी आपल्या मुलांच्या आरामासाठी, खेळण्याची आणि व्यायामाची वेळ निश्चित करुन द्यायला हवी. मुलांवर चांगले संस्कार करणं ही पालकांची जबाबदारी आहे"

नेमकं नव्या कायद्यात आहे तरी काय?चीनच्या या अनोख्या कायद्याच्या मसुद्यानुसार लहान मुलांनी एखादा अपराध केल्यास त्याची शिक्षा मुलाच्या आई-वडिलांना भोगावी लागणार आहे. चीनमध्ये अल्पवयीन आरोपींच्या वयाची अट १६ वर्ष इतकी आहे. जर कौटुंबिक नियमांचं पालन केलं जात नसेल तर एकदा समज दिली जाईल. केल्या गेलेल्या गुन्ह्याचं स्वरुप लक्षात घेता १ हजार युआन (जवळपास ११ हजार रुपये) दंड आकारला जाईल किंवा ५ दिवस तुरुंगवास ठोठावण्यात येईल. संपूर्ण देशात पालन-पोषण कौशल्य, नैतिकता आणि समाजवाद मूल्यांना प्रोत्साहन मिळावं यासाठी अशा स्वरुपाचा कायदा अस्तित्वात आणला जात असल्याचं चीन सरकारचं म्हणणं आहे. 

टॅग्स :chinaचीनInternationalआंतरराष्ट्रीय