शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनानंतर चीनमध्ये उद्भवतोय 'हा' नवा आजार! मुलांमध्ये झपाट्याने पसरतोय, अनेक शाळा बंद, अलर्ट जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 08:31 IST

चीनमधील बीजिंग आणि लिओनिंग येथील रुग्णालयात मोठ्या संख्येने मुलांना दाखल केले जात आहे.

बीजिंग : कोरोना महामारीनंतर आता चीनमध्ये एका नवीन आजाराने मोठ्या प्रमाणावर थैमान घातले आहे. चीनमधील अनेक शाळांमध्ये आणखी एक आजार वेगाने पसरत आहे. येथील शाळांमधील मुलांमध्ये न्यूमोनिया आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे. दरम्यान, ही चिंताजनक परिस्थिती कोरोना संकटाच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण करून देणारी आहे. 

चीनमधील बीजिंग आणि लिओनिंग येथील रुग्णालयात मोठ्या संख्येने मुलांना दाखल केले जात आहे. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, या रहस्यमय न्यूमोनियाच्या आजारामुळे अनेक शाळा बंद आहेत. दरम्यान, न्यूमोनियाने बाधित झालेल्या मुलांमध्ये फुफ्फुसात सूज येणे आणि ताप येणे, यासह असामान्य लक्षणे दिसून येत आहेत. मात्र, खोकला, आरएसव्ही आणि श्वसन रोगांशी संबंधित इतर लक्षणे त्या मुलांमध्ये दिसत नाहीत. 

ओपन-एक्सेस सर्व्हिलांस प्लॅटफॉर्म प्रोमेडने मंगळवारी विशेषत: लहान मुलांवर परिणाम होणाऱ्या निदान न झालेल्या न्यूमोनियाच्या उदयोन्मुख साथीच्या आजाराबद्दल चेतावणी दिली आहे. "हा उद्रेक नेमका केव्हा सुरू झाला हे स्पष्ट नाही, कारण इतक्या मुलांवर इतक्या लवकर परिणाम होणे असामान्य नाही", असे प्रोमेडने म्हटले आहे. याशिवाय, अहवालात असेही म्हटले आहे की, हा आजार एक महामारी आहे की नाही, यासंदर्भात अंदाज वर्तविणे घाईचे ठरेल. पण तरीही आपण सावधगिरी बाळगली पाहिजे.

दरम्यान, या नवीन उद्रेकामुळे रुग्णालयात मोठ्या प्रमाणात आजारी मुले आहेत, असे तैवानच्या आउटलेट एफटीव्ही न्यूजने वृत्त दिले आहे. तसेच, अधिकारी महामारी लपवत आहेत का? असा सवाल शाळेतील मुलांच्या पालकांनी उपस्थित केला आहे. परंतु नवीन उद्रेक मायकोप्लाझ्मा न्यूमोनियाशी संबंधित असू शकतो, ज्याला वॉकिंग न्यूमोनिया असेही म्हटले जाते, अशी शंका आहे, जी चीनमध्ये वाढत आहे.

टॅग्स :chinaचीनcorona virusकोरोना वायरस बातम्या