शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

चीन केवळ धमक्या देतो, हल्ला करायची ह‍िम्‍मत नाही; या छोट्याशा देशानं केलीय ड्रॅगनची हवा टाइट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 18:00 IST

जगातील काही प्रमुख शक्तीशाली देशांपैकी एक असलेला चीन शेजारील तैवानवर सातत्याने आपला अधिकार सांगत असतो. तैवान हा आपलाच भाग ...

जगातील काही प्रमुख शक्तीशाली देशांपैकी एक असलेला चीन शेजारील तैवानवर सातत्याने आपला अधिकार सांगत असतो. तैवान हा आपलाच भाग आहे आणि तैपेईला बीजिंगच्या आधीन आणण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे, असे चीन मानतो. तर दुसऱ्या बाजूला, आपण एक स्वतंत्र देश आहोत असे तैवान मानतो आणि चीनच्या दाव्याचा विरोध करतो. सध्या अमेरिकेचे राष्‍ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिवन बिजिंग दौऱ्यावर आहेत. दरम्यान, चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी आपल्या दाव्यांचा पुनरुच्चार करत, अमेरिकेने तैवानच्या चीनमधील शांततापूर्वक विलिनीकरणाचा स्वीकार करून त्यासाठी समर्थन द्यायला हवे, असे म्हटले आहे.

यावर, आता तैवानने पुन्हा एकदा आपला पक्ष ठेवत मोठे विधान केले आहे. चीन केवळ धमकी देतो. त्यांच्यात हल्ला करण्याची हिंमत नाही, असे तैवानने म्हटले आहे. हे चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना एक प्रकारचे खुले आव्हानच मानले जात आहे.

तैवानचे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, तैपेईवर संपूर्ण शक्तीने हल्ला करण्याची चीनची क्षमता नाही. कारण तसे करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेशी संसाधनं नाहीत. यामुळे शेजारी देश प्रगत शस्त्रे एकत्रित करत आहे. एवढेच नाही तर, चीनकडे तैवानला धमकावण्यासाठी इतरही पर्याय आहेत, असेही संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.

महत्वाचे म्हणजे, चीन लोकशाही असलेल्या तैवानला आपला भाग मानतो. आपल्या दाव्याला आणखी बळकटी देण्यासाठी, बीजिंगने गेल्या पाच वर्षांत लष्करी आणि राजकीय दबाव वाढवला आहे. तर दुसरीकडे, तैवान प्रत्येक व्यासपीठावर आणि संधी मिळेल तेथे चीनचा हा दावा ठामपणे फेटाळत असतो.

टॅग्स :chinaचीनXi Jinpingशी जिनपिंग