शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : हाहाकार! आता ना टेस्टिंग, ना क्वारंटाईन; कोरोना मृतांचा भयंकर आकडा पाहूनही चीनची मनमानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2022 13:25 IST

Corona Virus in China : जगाला कोरोनाची बिघडत चाललेली स्थिती दाखवण्यापासून वाचवण्यासाठी चीनने दररोज कोरोनाची संख्या नोंदवणे बंद केले आहे.

कोरोनाची वाढती प्रकरणे असूनही चीन क्वारंटाईनचे नियम आणि कठोर धोरण शिथिल करत आहे. सोमवारी, राष्ट्रीय आरोग्य आयोगाने जाहीर केले की परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना यापुढे क्वारंटाईन ठेवण्याची गरज नाही. नवा नियम 8 जानेवारीपासून लागू होणार आहे. सध्या, येणाऱ्या प्रवाशांना हॉटेलमध्ये पाच दिवस आयसोलेट ठेवल्यानंतर तीन दिवस घरीच राहावे लागते.

आयसोलेशन नियम संपुष्टात आणण्याबाबत चीनकडून एक मोठा यू-टर्न म्हणून पाहिले जात आहे. शी जिनपिंग यांच्या नेतृत्वाखालील प्रशासन जे आता झिरो कोविड धोरणावर अवलंबून होते ज्यात क्वारंटाईन, अनिवार्य चाचणी आणि संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी कठोर लॉकडाऊनचा समावेश होता, आता उर्वरित जगासाठी देश पुन्हा उघडत आहे.

चिनी शहरे संक्रमणाच्या स्फोटाचा सामना करण्यासाठी संघर्ष करीत आहेत. जगाला कोरोनाची बिघडत चाललेली स्थिती दाखवण्यापासून वाचवण्यासाठी चीनने दररोज कोरोनाची संख्या नोंदवणे बंद केले आहे. आता, ग्लोबल टाइम्सने अहवाल दिला आहे की की केवळ ताप किंवा फ्लूसारखी लक्षणे असलेल्या प्रवाशांची विमानतळांवर अँटीजन चाचणी केली जाईल. असे मानले जात आहे की चीन हे असे करत आहे जेणेकरून जगाला संदेश जाईल की त्यांच्या देशात कोरोनाची स्थिती सामान्य आहे.

चीनच्या आरोग्य आयोगाने सांगितले की, काही परदेशी लोकांना देशात प्रवेश करणे सोपे करण्यासाठी निर्बंध कमी करण्यात आले आहेत, जरी यात पर्यटकांचा समावेश नाही. अनेक देशांतील हॉटेल्स आणि संबंधित व्यवसायांसाठी कमाईचा एक महत्त्वाचा स्रोत असलेल्या चिनी नागरिकांना हळूहळू पर्यटनासाठी पुन्हा परदेशात जाण्याची परवानगी दिली जाईल, असे संकेत दिले. एका हिंदी  वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीन