वॉशिंग्टन : तिबेटियन धर्मगुरू दलाई लामा आणि चीन सरकार यांच्या दूतांत चर्चा झाल्याच्या वृत्तानंतर अमेरिकेने उभय पक्षांनी समोरासमोर चर्चा करण्याचे आवाहन केले आहे. आपण अशा थेट चर्चेचा पुरस्कार करतो, असेही अमेरिकेने म्हटले. परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या जेन साकी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, चीन सरकार आणि दलाई लामा किंवा त्यांच्या प्रतिनिधींत कोणत्याही पूर्वअटीशिवाय थेट आणि ठोस चर्चा व्हावी, असे आम्ही दीर्घ काळापासून म्हणत आहोत. (वृत्तसंस्था)
चीन, लामा यांना थेट चर्चेचे आवाहन
By admin | Updated: January 9, 2015 02:17 IST