शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

तैवानला मिळणाऱ्या समर्थनामुळे चीन भडकला, आवाज उठवणाऱ्यांना देणार 'ही' शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2021 09:54 IST

China : चीनने तैवानच्या स्वातंत्र्याच्या समर्थकांना उघडपणे धमकी देण्याची ही पहिलीच वेळ आहे.

बिजिंग : तैवानच्या (Taiwan) समर्थनार्थ उठलेला आवाज चीन (China) नेहमीच दाबत आला आहे. आता चीनने आणखी एक भयानक पाऊल उचलले आहे. चीनचे कम्युनिस्ट सरकार तैवानच्या स्वातंत्र्याबाबत समर्थन करण्याऱ्या लोकांना आयुष्यभर गुन्हेगार ठरणार आहे. चीनच्या तैवान अफेयर्सच्या कार्यालयाचे प्रवक्ते जू फेंग्लियन यांनी ही माहिती दिली. दरम्यान, चीनने तैवानच्या स्वातंत्र्याच्या समर्थकांना उघडपणे धमकी देण्याची ही पहिलीच वेळ आहे.

चीन आणि तैवान यांच्यातील तणाव गेल्या काही दिवसांपासून वाढला आहे. ऑक्टोबरमध्ये चीनने तैवानच्या हवाई क्षेत्रात सुमारे 200 लढाऊ विमाने पाठवली होती. चीनने तैवानवर आपला दावा सातत्याने केला आहे आणि ते चीनमध्ये विलीन करण्यासाठी लष्करी कारवाईसाठीही उत्सुक असल्याचे दिसून येते. या मुद्द्यावर अमेरिकाही चीनच्या विरोधात आहे. मात्र, असे असूनही, चीन आपल्या कृत्यांपासून परावृत्त होत नाही.

पहिल्यांदाच अशी यादी जारीचीनने एक यादी काढली आहे. यामध्ये तैवानचे पंतप्रधान सु त्सेंग चांग, संसदेचे अध्यक्ष यू सी-कुन आणि परराष्ट्र मंत्री जोसेफ वू यांना "हट्टी तैवानचे स्वातंत्र्य समर्थक" म्हणून नावे जाहीर केली आहेत. अशी यादी प्रथमच सार्वजनिक करण्यात आली आहे. यादीत नाव असलेल्यांना चीन आणि हाँगकाँग आणि मकाऊ सारख्या विशेष प्रशासकीय प्रदेशात प्रवेश दिला जाणार नाही, असे चीनने म्हटले आहे.

'अशा लोकांना जनता नाकारेल'फेंग्लियनने म्हटले आहे की, काळ्या यादीत टाकलेल्या लोकांना संस्था किंवा चीनच्या लोकांसोबत सहकार्य करण्याची परवानगी दिली जाणार नाही. चीन या लोकांविरुद्ध 'इतर आवश्यक उपाय' करेल असे त्यांनी म्हटले आहे. याचबरोबर, 'आम्ही तैवानच्या स्वातंत्र्य समर्थकांना स्पष्ट संदेश देऊ इच्छितो की, जे आपल्या पूर्वजांना विसरतात, मातृभूमीशी गद्दारी करतात, देश तोडण्याचे काम करतात, त्यांचा शेवट कधीही चांगला होऊ शकत नाही. त्यांना जनता नाकारेल', असे फेंग्लियन म्हणाले.

टॅग्स :chinaचीन