बीजिंग : चीनच्या अधिकृत सरकारी वेतनपत्रकावर असणा-या व तरीही काम न करता नुसताच पगार खाणा-या १ लाख ६० हजार बनावट सरकारी कर्मचा-यांची चीनने हकालपट्टी केली आहे. संपूर्ण देशभर चालविलेल्या या मोहिमेअंतर्गत काम न करता नुसताच सरकारी पगार खाणाऱ्या कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यात आला, तसे १ लाख ६२ हजार ६२९ कर्मचारी आढळले. पीपल्स डेली या सरकारी वृत्तपत्राने ही माहिती दिली आहे. पुढे दिलेल्या वृत्तानुसार हेबेई प्रांतात सर्वाधिक सरकारी जावई आढळले. त्यांची संख्या ५६ हजार भरली. देशातील भ्रष्टाचार व सरकारी पैशाचा गैरवापर याविरोधात चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी मोहीम उघडली आहे. भ्रष्टाचार विरोधात चिनी जनतेत मोठ्या प्रमाणावर संताप होता. तो लक्षात घेऊन ही मोहीम सुरूकरण्यात आली आहे. चीनमध्ये स्वतंत्र विधिव्यवस्थेसारख्या मूलभूत सोयी नसल्यामुळे या मोहिमेत अडथळे आले असे टीकाकारांचे म्हणणे आहे.
चीनने हाकलले दीड लाख बोगस सरकारी कर्मचारी
By admin | Updated: October 6, 2014 23:08 IST