शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

चीनने जैविक युद्ध लढण्याचा केला होता विचार, अमेरिकेच्या विदेश विभागाने केला दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 06:11 IST

‘द ऑस्ट्रेलियन’ वृत्तपत्राने हे खळबळजनक दस्तावेज प्रथमत: जारी केले होते. ब्रिटनमधील ‘द सन’ या वृत्तपत्राने या ‘द ऑस्ट्रेलियन’च्या वृत्ताच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

लंडन/मेलबॉर्न : कोविड-१९ च्या साथीच्या पाच वर्षांपूर्वी चीनच्या लष्करी शास्त्रज्ञांनी कोरोना विषाणूचा हत्यार म्हणून वापर करण्यासाठी विचार केला होता, तसेच तिसरे महायुद्ध जैविक शस्त्राने लढण्याचे भाकीत केले होते, असा दावा अमेरिकेच्या विदेश विभागाने प्राप्त दस्तावेजांच्या हवाल्याने केला आहे. प्रसारमाध्यमांतील वृत्तात हा दावा करण्यात आला आहे.‘द ऑस्ट्रेलियन’ वृत्तपत्राने हे खळबळजनक दस्तावेज प्रथमत: जारी केले होते. ब्रिटनमधील ‘द सन’ या वृत्तपत्राने या ‘द ऑस्ट्रेलियन’च्या वृत्ताच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. हे दस्तावेज अमेरिकेच्या विदेश विभागाने मिळविले आहेत. या दस्तावेजानुसार चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या अधिकाऱ्यांनी हे भयावह भाकीत केले होते.चिनी लष्कराचे शास्त्रज्ञ आणि चिनी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी २०१५ मध्ये हे दस्तावेज लिहिले होते. हे दस्तावेज अमेरिकेच्या विदेश विभागाच्या हाती लागले आहेत. कोविड-१९ चा उगम शोधण्यासाठी चौकशीचा भाग म्हणून चीनने हे दस्तावेज लिहिले होते.सार्स कोरोना विषाणूचेे कोविड हे एक उदाहरण असल्याचे चिनी शास्त्रज्ञांनी म्हटले होते, तसेच याचा जैविक शस्त्राचे नवयुग असल्याचा या दस्तावेजात उल्लेख केला होता.तथापि, चीनच्या ग्लोबल टाइम्स वृत्तपत्राने ‘द ऑस्ट्रेलियन’ने हे वृत्त चीनची प्रतिमा मलिन करण्यासाठी हा वृत्तांत प्रकाशित केल्यावरून ‘द ऑस्ट्रेलियन’वर टीका केली आहे.  कोरोनाचा संसर्ग जगभर पसरलेला असताना सुरुवातीपासून संशयाची सुई चीनकडे आहे.­

सार्ससुद्धा जैविक हत्यार ?या दस्तावेजात असेही म्हटले आहे की, २००३ मधील सार्स एक मानवनिर्मित जैविक हत्यार असू शकते. ते अतिरेक्यांनी जाणीवपूर्वक पसरविले. संसदसदस्य टॉम टगेनधट आणि ऑस्ट्रेलियातील राजकीय पक्षाचे नेते जेम्स पेटरसन यांनी म्हटले आहे की, या दस्तावेजांनी चीनच्या पारदर्शकतेबाबत चिंता निर्माण केली आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीनAmericaअमेरिका