शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

घटस्फोट हवा? मग पत्नीनं केलेल्या घरकामाची भरपाई दे; न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2021 14:09 IST

बीजिंगमधील न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; पत्नीनं केलेल्या घरकामाची भरपाई म्हणून ५० हजार युवान देण्याचे आदेश

नवी दिल्ली: घटस्फोटानंतर पत्नीला पतीकडून पोटगी मिळते, अशी तरतूद आपल्या देशाच्या कायद्यात आहे. पत्नीला गुजराण करता यावी यासाठी ही तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे पतीला घटस्फोटानंतर पत्नीला महिन्याकाठी एक ठराविक रक्कम द्यावी लागते. मात्र चीनमध्ये एका व्यक्तीला पत्नीला घरात केलेल्या कामाची भरपाईदेखील द्यावी लागणार आहे. बीजिंगमधल्या न्यायालयानं हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.बीबीसीनं दिलेल्या वृत्तानुसार, घटस्फोटानंतर महिलेला ५० हजार युवान (५.६ लाख रुपये) मिळतील. पाच वर्षांच्या संसारात घरात केलेल्या कामाचं मूल्य म्हणून महिलेला ही रक्कम मिळेल. घटस्फोटानंतर महिलांना त्यांनी संसारात केलेल्या कामाची भरपाई देणारा कायदा चीन सरकारनं केला आहे. महिला संसार करताना मुलांना वाढवतात, ज्येष्ठांची देखभाल करतात, पतीला त्यांच्या कामांत मदत करतात. याची भरपाई त्यांना घटस्फोटानंतर मिळायला हवी, असं चीनचा नवा कायदा सांगतो.बीजिंगच्या न्यायालयात गेल्या वर्षी चेन नावाच्या व्यक्तीनं घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती. पत्नी वँगपासून घटस्फोट मिळावा यासाठी चेन यांनी अर्ज केला होता. चेन आणि वँग २०१५ मध्ये विवाह बंधनात अडकले. मात्र वाद होत असल्यानं ते २०१८ पासून वेगळे राहत आहेत. वँग यांनी सुरुवातीला घटस्फोटास नकार दिला. पण संसार सुरू असताना पती घरकामात मदत करत नसल्यानं, मुलांकडे दुर्लक्ष करत असल्यानं तिनं आर्थिक मदत मागितली.बीजिंगमधल्या फँगशॅन न्यायालयानं वँगच्या बाजूनं निर्णय दिला. चेन यांनी वँगला महिन्याकाठी २ हजार युवानची पोटगी द्यावी. यासोबतच संसार सुरू असताना तिनं केलेल्या कामाची भरपाई म्हणून ५० हजार युवान अतिरिक्त द्यावेत, असा आदेश न्यायालयानं दिला. दाम्पत्य विवाह बंधनात असलेला काळ, वँगनं घरात केलेली कामं, चेनचा उत्पन्न आणि उदरनिर्वाहासाठी त्या भागात येत असलेला खर्च यांचा विचार करून ५० हजार युवान ही रक्कम निश्चित करण्यात आली. 

टॅग्स :Divorceघटस्फोट