शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चीनने सरावार्थ डागली क्षेपणास्त्रे; जपानमध्ये पडल्याने नवा वाद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 06:40 IST

सहा ठिकाणी चिनी युद्धनौका, लढाऊ जहाजांच्या कसरती

बीजिंग/तैपेई : चीन व तैवानमधील वाद वाढतच चालला आहे. अमेरिकी संसदेच्या सभापती नॅन्सी पॅलोसी तैवानहून परतताच चीन आक्रमक झाला असून, त्याच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) तैवानच्या आजूबाजूला सहा ठिकाणी जोरदार लष्करी सराव सुरू केला आहे. चीनने तैवानच्या दिशेने काही क्षेपणास्रे डागली. चीनने डागलेली क्षेपणास्रे पहिल्यांदाच जपानच्या विशेष आर्थिक क्षेत्रात कोसळली आहेत, असे जपानचे संरक्षण मंत्री नोबुओ किशी यांनी गुरुवारी सांगितले. त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

चीनने तैवानच्या ईशान्य आणि नैऋत्य तटाजवळ अनेक आंतरखंडीय क्षेपणास्त्रे तैनात केली आहेत. चीनने या लष्करी सरावाचे लाईव्ह फायरिंग, असे नामकरण केले आहे. तैवानच्या किनाऱ्यापासून केवळ १६ किमी अंतरावर हा सराव करण्यात येत असल्याचे वृत्त चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेने दिले. या सरावात अस्सल शस्त्रे व दारूगोळ्याचा वापर करण्यात येत असून, हा सराव ७ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. चीन पूर्वी हा सराव तैवानपासून १०० किमीवर करत होता. मात्र, नॅन्सी यांच्या दौऱ्यानंतर तो आता खूपच जवळ सराव करत आहे. 

आम्हाला युद्ध नकोय : तैवानतैवाननेही अंतर्गत संरक्षणासाठी सराव सुरू केला आहे. आम्हाला कोणत्याही प्रकारचा तणाव नको आहे. देश वाद निर्माण होईल, अशा कोणत्याही स्थितीच्या विरोधात आहे. आम्हाला युद्ध नकोय पण, आम्ही युद्धासाठी सज्ज राहू, असे तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. 

तैवानच्या आग्नेयेला अमेरिकी नौकाफिलिपीन्स सागरात अमेरिकी नौदलाची युद्धनौका दिसून आली. जेथे ही युद्धनौका दिसली, तो तैवानचा आग्नेय परिसर आहे. अमेरिकेची युद्धनौका युएसएस रोनाल्ड रिगन तेथे नियमित गस्त घालत असल्याचे अमेरिकी नौदलाने म्हटले आहे.  

जागतिक पुरवठ्यावर परिणामचीन तैवानजवळील समुद्रात लष्करी सराव करत आहे. जगभरातील जवळपास निम्मी मालवाहू जहाजे याच मार्गावरून जातात. सेमी कंडक्टर व अन्य इलेक्ट्राॅनिक उपकरणे जगभर पाठवली जातात. नैसर्गिक वायू पुरवठ्यासाठीही हा सागरी मार्ग महत्त्वपूर्ण आहे. चीन या लष्करी सरावामुळे सागरी वाहतूक बाधित होण्याची शक्यता आहे.  

पेलोसींनी चीन-तैवान संबंधांवर वक्तव्य टाळलेसेऊल : तैवानचा दौरा करून चीनचा पारा चढविल्यानंतर अमेरिकी संसदेच्या अध्यक्ष नॅन्सी पेलोसी यांनी गुरुवारी येथे द. कोरियात राजकीय नेत्यांच्या भेटी घेतल्या. तथापि, त्यांनी चीन-तैवान संबंधांवर जाहीर वक्तव्य करणे टाळले.

टॅग्स :chinaचीनJapanजपान