शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

चीनला भूकंपाचा धक्का; १७५ मृत्युमुखी

By admin | Updated: August 4, 2014 01:58 IST

चीनच्या युन्नान प्रांतात रविवारी झालेल्या भूकंपात १७५ जणांचा बळी गेला,

बीजिंग : चीनच्या युन्नान प्रांतात रविवारी झालेल्या भूकंपात १७५ जणांचा बळी गेला, तर १४०० नागरिक जखमी झाले. ६.५ रिश्टर स्केल एवढ्या तीव्रतेच्या या भूकंपाने भीषण जीवित आणि वित्तहानी घडवून आणली आहे. लुदिआन भागात १२० जण मृत्युमुखी पडले, तर १८१ नागरिक बेपत्ता असून १३०० जण जखमी झाले आहेत. १२ हजारांहून अधिक घरे भुईसपाट झाली असून ३० हजार घरांची हानी झाली आहे. लुदिआन प्रांतातील विद्युत पुरवठा व दूरध्वनी संपर्क खंडित झाला आहे. या भूकंपाने क्विआओजिआ भागातही ३० जणांचा बळी घेतला असल्याचे चीनची सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने म्हटले आहे. लोंगटोउशाननगरातील बचाव व मदत मोहिमेत सहभागी झालेल्या मा हाओ या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने परिस्थिती भयंकर असल्याचे सांगितले. कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून आपण ४० जिवंत व्यक्तींना बाहेर काढले आहे. मला ढिगाऱ्याखाली अनेक मृतदेह दिसून आले. प्रामाणिकपणे सांगतो या मृतदेहांची काळजी घेण्यास आमच्याकडे वेळ नाही ही खरच शरमेची बाब आहे. मात्र, सर्वप्रथम जिवंत व्यक्तींना मदत करणे आमचे कर्तव्य आहे, असे तो म्हणाला. भूकंपाचा केंद्रबिंदू १२ किमी खोलीवर होता, असे चीन भूकंप केंद्राने म्हटले आहे. मला माझ्या पाच मजली घरात जोराचा धक्का बसला आणि काही वस्तू खाली पडल्या, असे लुडियान भागातील एका नागरिकाने सांगितले. भूकंपानंतर बहुतांश नागरिक घाबरून घरातून रस्त्यावर आले. मा लिया या महिलेने सांगितले की, बॉम्बहल्ल्यानंतर रणभूमीची जशी अवस्था होते तशीच अवस्था रस्त्यांची झाली आहे. माझ्या शेजाऱ्याचे नवे दोन मजली घर भुईसपाट झाले आहे. झाओटोंग शहराने ३०० पोलीस आणि अग्निशमन कर्मचाऱ्यांना भूकंपग्रस्त भागात रवाना केले आहे. याशिवाय ३९२ बचाव कर्मचारी आणि १२ शोधक श्वानही पाठविण्यात आले आहेत. नागरी व्यवहार प्रशासनाने दोन हजार तंबू, ३ हजार बिछाने व इतर साहित्य पाठवले आहे. लुडियान भागात सात नगरे असून दोन लाख ६५ हजार ९०० एवढी तेथील लोकसंख्या आहे. (वृत्तसंस्था)