शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

चीनचा पुन्हा अडेलपणा! कोरोनाचं मूळ शोधण्यासाठी WHO च्या वैज्ञानिकांना वटवाघळांच्या गुहेपर्यंत जाण्यास रोखलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 20:18 IST

चीननं (China) जागतिक आरोग्य संघटनेला (WHO) वुहान येथील वटवाघळांच्या गुहेत (Bats Caves) संशोधन करण्यास नकार दिला आहे.

चीननं (China) जागतिक आरोग्य संघटनेला (WHO) वुहान येथील वटवाघळांच्या गुहेत (Bats Caves) संशोधन करण्यास नकार दिला आहे. कोरोना विषाणूचं मूळ शोधण्यासाठी वुहानस्थित वटवाघळांच्या गुहांमध्ये महत्त्वाचे धागेदोरे हाती लागू शकण्याची शक्यता आहे. त्यामुळे डब्ल्यूएचओच्या वैज्ञानिकांना या गुहांमध्ये जाऊन संशोधन करायचं आहे. वैज्ञानिकांना हुबेई प्रांतातील एंशी परिसरातील गुहांमध्ये आणि वन्यजीवांच्या शेतीच्या क्षेत्रातील परिसराचा दौरा करायचा आहे. मूळ शहरापासून ही जागा जवळपास सहा तासांच्या अंतरावर आहे. कोरोनाचा पहिला रुग्ण वुहान येथेच आढळून आला होता. 

वुहान येथे कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर जगभरात कोरोनाचे रुग्ण आढळू लागले होते. संपूर्ण जगभरात या विषाणूनं कहर केला. यात सर्व देशांच्या अर्थव्यवस्थांना देखील मोठा फटका बसला. लाखो लोकांना आपला जीव गमावावा लागला. कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आता जवळपास दीड वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. पण हा विषाणू नेमका आला कुठून? विषाणू प्रयोगशाळेतून बाहेर पडला की वटवाघळांपासून मनुष्यापर्यंत पोहोचला याचं नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी WHO च्या वैज्ञानिकांना वुहानमधील वटवाघळांच्या गुहेत संशोधन करायचं आहे. 

कोरोना विषाणूचं उगामस्थान देशाबाहेरच, चीनचा दावावॉशिंग्टन पोस्टच्या माहितीनुसार, डब्ल्यूएचओच्या वैज्ञानिकांना ज्या परिसरात संशोधन करायचं आहे त्या परिसरात जंगली प्राण्याच्या वास्तव्यासाठी ओळखला जातो. इथं पकडण्यात आलेल्या वन्यजीवांची बाजारा विक्री केली जाते. याच ठिकाणाहून वटवाघळांमधून वन्य प्राण्यांमध्ये आणि प्राण्यांमधून मनुष्यात कोरोना विषाणूचं संक्रमण झालं आहे, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. पण चीनी अधिकाऱ्यांनी डब्ल्यूएचओच्या वैज्ञानिकांना संशोधन करण्याची परवानगी दिलेली नाही. कोरोना विषाणूचं पहिलं प्रकरणं चीनमध्ये आढळण्याच्या वृत्ताचं चीन आजवर खंडन करत आला आहे. कोरोना विषाणूचं उगमस्थान देशाबाहेर असल्याचा दावा चीननं केला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीनWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना