शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

या मुलाकडे आहे १ मिलिअन डॉलर्सचं शूज् कलेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2017 18:20 IST

लोकांना कसलेही छंद अस शकतात आणि शेवटी तुम्हाला तर माहित्येय की छंदाला मोल नसतं.

ठळक मुद्देहा कोणा सामान्य माणसाचा मुलगा नाही. तो गडगंज श्रीमतांच्या घरी जन्माला आलाय.तसेच हा मुलगा सोशल मीडियावरही फार अॅक्टीव्ह असतो. तेथे त्याचे फोलोअर्सही अधिक आहेत. शाहरुख खान, सलमान खान, सेफ अली खान, विझ कलिफा, टियागा, मेसी, निकी मिनाज असे अनेक दिग्गज कलाकारही त्याची भेट घेऊन गेलेत.

दुबई - कोणाला कशाचाही छंद असू शकतो. प्रत्येक जण आपल्या ऐपतीप्रमाणे आपला छंद जोपासत असतात. या छंदातून कित्येकांना प्रसिद्धीही मिळाली आहे. छंदामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेला एक चिमुकला सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला आहे. चप्पल खरेदी करण्याच्या छंदातून त्याने जवळपास १ मिलिअन डॉलरचे शू कलेक्शन जमा केलं आहे.

दुबईत राहणारा रॅश बेल्हासा हा अवघा १५ वर्षांचा चिमुकला. त्याच्याकडे १ मिलिअन डॉलरचे शू कलेक्शन आहे. मुळातच तो युट्यूब आणि इन्स्टाग्रामवर फार प्रसिद्ध आहे. त्यामुळे त्याचा हा छंद सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक नेटिझन्सपर्यंत पोहोचला. आता तुम्ही म्हणाल या एवढ्या लहान मुलाकडे एवढे पैसे आले तरी कुठून? 

रॅश हा कोणा सामान्य माणसाचा मुलगा नाही. तो गडगंज श्रीमतांच्या घरी जन्माला आलाय. दुबईतील प्रसिद्ध व्यावसायिक सेफ अहमेद बेल्हासा यांचा तो मुलगा. रॅश जन्मजातच श्रीमंत आहे. तसेच सोशल मीडियावर त्याचे फोलोअर्सही अधिक आहेत. त्यामुळे त्याने त्याच्या या शू कलेक्शनविषयी सोशल मीडियावर सांगितले असता अनेकांचे डोळेच फिरले. या मुलाकडे चप्पलाच जर १ मिलिअनच्या असतील तर याचं राहणीमान किती उंच असेल याविषयी चर्चाच करायला नको.

बरं, या चिमुकल्याची ओळख बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंतच्या सगळ्या कलाकारांशी आहे. त्यांच्या फार्महाऊसवर अनेक जंगली प्राणी आहेत. सिंह, वाघ, बिबटे त्यांनी घरात पाळलेले आहेत. त्यामुळे या प्राण्यांना पाहण्यासाठी शाहरुख खान, सलमान खान, सेफ अली खान, विझ कलिफा, टियागा, मेसी, निकी मिनाज असे अनेक दिग्गज कलाकार येऊन गेलेत. सेफ अहमेद बेल्हासा यांच्याकडे अनेक आलिशान गाड्या आहेत. त्यापैकी रॅशकडे स्वत:ची अशी फेरारीही आहे. 

रॅश जन्मजात श्रीमंत असला तरीही त्याने त्याची एक वेगळी ओळख निर्माण केलीय. त्याचं शू कलेक्शन तर आहेच, त्याचप्रमाणे त्याचं स्वत:चं कपड्याचं कलेक्शन आहे. मात्र या कपड्यांच्या कलेक्शनमधून तो अफाट कमवतोय. केवळ वडिलांच्या जीवावर न राहता, स्वत:ही व्यवसाय करू लागलाय. म्हणूनच तो सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला आहे. 

सौजन्य - www.rvcj.com

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयSalman Khanसलमान खानShahrukh Khanशाहरुख खानFerrariफेरारी