शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

'मुलाची सर्व गुन्ह्यांमधून निर्दोष मुक्त केले' ट्रम्प यांनी बायडेन यांच्या निर्णयावर टीका केली; म्हणाले, 'अधिकारांचा गैरवापर केला'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 12:54 IST

अमेरिकेचे अध्यक्षपद सोडताना जो बायडेन यांनी आपला मुलगा हंटरला माफी दिली आहे आणि संभाव्य तुरुंगवासाच्या शिक्षेपासून वाचवले. यावरुन आता डोनाल्ड ट्रम्प यांनी बायडेन यांच्यावर निशाणा साधला .

अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी जाताजाता पोटच्या मुलाचे गंभीर गुन्हे माफ केले आहेत. संभाव्य तुरुंगवासाच्या शिक्षेपासून वाचवले आहे. यावरुन आता आरोप -प्रत्यारोप सुरू आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी बायडेन यांच्यावर निशाणा साधला असून बायडेन यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर केला असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. पोस्टमध्ये ट्रम्प म्हणाले, बायडेन यांन आपला मुलगा हंटरला जी माफी दिली आहे त्यात j-6 कैद्याचाही समावेश आहे का? जो वर्षानुवर्षे तुरुंगात आहे. ट्रम्प म्हणाले, हा न्यायाचा किती गैरवापर आहे.

J6 कैदी ६ जानेवारी २०२१ रोजी कॅपिटल हिलवर झालेल्या दंगलीतील गुन्हेगार म्हणून  तुरुंगात टाकलेल्या लोकांचा संदर्भ देतात. ट्रम्प आणि त्यांच्या समर्थकांनी पकडलेल्या लोकांना ओलीस म्हटले आहे आणि दावा केला आहे की ते शांततेने आणि देशभक्तीने वागत आहेत.

बायडेननी जाता जाता शब्द मोडला; चेन स्मोकर मुलाला गंभीर गुन्ह्यांतून दोषमुक्त केले

तसेच, असा कयास लावला जात आहे की डोनाल्ड ट्रम्प एकदा अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ते ६ जानेवारी २०२१ रोजी कॅपिटल हिल वेढा प्रकरणी तुरुंगात असलेल्यांना माफी देतील.

जो बायडेन यांचा मुलगा हंटर यांच्यावर आरोप कोणते होते?

बायडेन यांनी रविवारी त्यांचा मुलगा हंटरच्या माफीवर स्वाक्षरी केली, हंटरवर बंदुकीबाबतचा गुन्हा आणि कर उल्लंघनाशी संबंधित आरोपांवर दोषी ठरवण्यात आले होते. या गुन्ह्यांसाठी हंटरला यापुढे शिक्षेला सामोरे जावे लागणार नाही. 

फक्त त्यांचा मुलगा असल्याने त्यांना लक्ष्य करण्यात आले, असा युक्तिवाद बायडेन यांच्या वतीने करण्यात आला. बायडेन म्हणाले की त्यांनी आपल्या कारकिर्दीत एक साधे तत्व पाळले आहे. ते नेहमी न्याय्य असतील. 'माझा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे, असंही ते म्हणाले. मला वाटते की एका वडील आणि राष्ट्राध्यक्षाने हा निर्णय का घेतला हे अमेरिकन लोकांना समजेल, असंही बायडेन म्हणाले. 

टॅग्स :Joe Bidenज्यो बायडनDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका